Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पारनेर दुय्यम कारागृहात आरोपींकडे मोबाईल सापडले ; गुन्हा दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर येथे असणाऱ्या दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन आरोपींकडे तपासणी दरम्यान दोन मोबाईल आढळून आले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पारनेर दुय्यम कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 25 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास दक्षिण विभागीय गस्त दरम्यान नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी पारनेर पोलीस ठाण्यात भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी दुय्यम कारागृहाची नियमित तपासणी करण्यासाठी दुय्यम कारागृहाचे जेलार तथा तहसीलदार ज्योती देवरे (पारनेर) व पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना सांगण्यात आले. याप्रमाणे अधिकार व पोलीस अंमलदाराचे उपस्थितीत दुय्यम कारागृहाची अचानक नियमित तपासणी केली. या तपासणीत न्यायालयीन कोठडीत असणारे आरोपी सौरभ गणेश पोटघन, अविनाश निलेश कर्डिले यांच्या ताब्यात दोन सॅमसंग कंपनीचे मोबाईल सापडले. आरोपींकडे मोबाईलबाबत विचारणा केली असता, मोबाईल हे भत्ता देणारे सुभाष लोंढे व प्रवीण देशमुख (दोघे रा. सुपा ता. पारनेर जि.अहमदनगर) यांनी दिल्याचे सांगितले. दोघांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुरनं 255/ 2021 कारागृह अधिनियम 1894 चे कलम 42, 45 (12) सह भादवि कलम 34 प्रमाणे दि. 25 एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई बालाजी पदमणे हे करीत आहेत.

Post a Comment

1 Comments