Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष्य द्या, लसीकरणापेक्षा कोरोना चाचण्या महत्वाच्या' - मोदी

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. बैठकीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण करत आहे, आपल्याला यावर लक्ष्य देण्याची गरज आहे. आता मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष्य द्यावे लागेल. यावर सरकारला जास्त मेहनत घ्यावी लागेल. आपण मागच्या वर्षी दहा लाख अॅक्टीव्ह रुग्ण पाहिले आहेत, त्यावर आपण यश मिळवले. आता आपल्याकडे अनुभव आणि संसाधन आहे. आपण या महामारीला थांबवू शकतो.
पंतप्रधानांसोबत यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि इतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

लोक आता कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत - यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पीकला क्रॉस केले आहे. यावेळेस ग्रोथ रेट आधीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबसह अनेक राज्यांनी कोरोनाच्या पीकला क्रॉस केले आहे. अनेक राज्ये याकडे वेगाने जात आहेत. लोक आता कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, ही चिंतेची बाब आहे.

व्हॅक्सीनपेक्षा टेस्टिंग महत्वाच्या - मोदी पुढे म्हणाले, मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, तुम्ही मशीनरीद्वारे सर्व्हे करा. आधी कोरोनाच्या हलक्या लक्षाणांनाही लोक घाबरायचे. पण, आता लोक या लक्षणांना घाबरत नाहीयेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, आता कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्यामुळे अनेकांमध्ये लक्षणेच दिसत नाहीयेत. यासाठी टेस्टिंग गरजेची आहे. आता सर्व सरकारांनी व्हॅक्सीनपेक्षा टेस्टिंगवर भर द्यावी.

नवीन व्हॅक्सीनेशन डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न सुरू - मोदी पुढे म्हणाले की, एम्स दिल्ली प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी वेबिनार करत आहेत. हे सतत व्हायला हवे, इतर रुग्णालयांनीही यात यावे. अँबुलंस, वेंटिलेटर आणि ऑक्सीजनचाही रिव्ह्यू गरजेचा आहे. सध्या देशात नवीन व्हॅक्सीनेशन डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न सुरू आहेत.

11 एप्रिल ते 14 एप्रिलमध्ये लसीकरण उत्सव साजरा करा - मोदी पुढे म्हणाले की, व्हॅक्सीनचे वेस्टेज आपल्याला थांबवायचे आहे. राज्यांच्या सल्ल्यानेच देशासाठीची रणनिती तयार केली आहे. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले आणि 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यादरम्यान आपण लसीकरण उत्सव साजरा करायला हवा. एक अभियान चालवून जास्तीत-जास्त लोकांना लस दिली जावी.

Post a Comment

0 Comments