Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कत्तलीसाठी बांधण्यात आलेल्या जनावरांची भिंगार पोलिसांनी केली सुटका

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कत्तलसाठी 5 बैल, 5 गायी, 4 गोर आणि 2 कालवडी नागरदेवळेफाटा रणजित हाॅटेलमागे बांधून लपवून ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी भिंगार कॅम्प पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला. यावेळी बांधण्यात आलेल्या जनावरांची पोलिसांनी सुटका केली. जनावरांना कत्तलीसाठी आणणा-या ईलियास बाबु कुरेशी (रा.टावरेगल्ली, जिल्हाधिकारी कार्यालयामागे, अ.नगर) याच्याविरुध्द पोना राजेंद्र सुद्रीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशु (शुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5(ब) व प्राण्यांना क्ररतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(ज) तसेच भादविक 269 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई बेंडकोळी, पोना राजेंद्र सुद्रीक, खेडकर आदिसह पोलिस कर्मचारी पथकाने ही कारवाई केली आहे.Post a Comment

0 Comments