Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्य सरकारांनी लॉकडाउनला अखेरचा पर्याय म्हणून पहावे : नरेंद्र मोदी

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर 
 देशातील कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित केले. मोदींनी आपल्या संबोधनात लॉकडाउनबाबत मोठे वक्तव्य केले. मागच्या वर्षी लॉकडाउनची घोषणा करणाऱ्या मोदींनी यावेळी न करण्याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, राज्य सरकारांनी लॉकडाउनला अखेरचा पर्या म्हणून पहावे.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोनाविरोधात देश आज खूप मोठी लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी परिस्थिती नियंत्रणात आली होती, पण आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने परिस्थिती अजून बिघडली आहे. जो त्रास तुम्हाला होत आहे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी आपला जवळचा व्यक्ती गमावला आहे, त्यांच्याबद्दल मला दुःख आहे. मी कुटुंबातील व्यक्ती म्हणून तुमच्या दुःखात सामील आहे.
👉देशाने जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस दिली -  ते पुढे म्हणाले की, मागच्या वर्षी जेव्हा काही रुग्ण सापडेल होते, तेव्हाच कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू झाली होती. शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र एक करुन कोरोना लस तयार केली. भारताने सर्वात स्वस्त कोरोना लस तयार केली. ही लस जगातील अनेक देशात भारत पोहचवत आहे.
👉ऑक्सीजन पुरवण्याचे प्रयत्न सुरू - मोदी पुढे म्हणाले की, आता आलेलं संकट मोठं आहे, पण आपल्याला हे संकट विश्वासाने पार करायचं आहे. सर्व डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक या सर्वांनी आपलं आयुष्य पणाला लावून जीव वाचवले. या लाटेतही त्यांनी आपली चिंता, आपलं कुटुंब सोडून सेवा सुरुच ठेवली आहे.
आपल्या शास्त्रात म्हटलंय, कठीण पेक्षाही कठीण काळात आपल्याला धैर्य सोडायला नको. कोणत्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतला तरच आपण यश प्राप्त करु शकतो. याच मंत्राला फॉलो करत देश पुढे जात आहे. कोरोना संकटात देशातील अनेक भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या विषयावर पूर्णपणे संवेदनशीलपणे काम केले जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांचे सर्वांचे प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
👉बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू - पंतप्रधान पुढे म्हणाले की, यावेळेस फार्मा सेक्टरने औषधांचे उत्पादन वाडवले आहे. जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत आज जास्त औषधे तयार केली जात आहेत. याला अजून वेग दिला जात आहे. मला आनंद वाटतोय की, आपल्या देशात खुप मोठा फार्मा सेक्टर आहे. माझे फार्मा सेक्टरच्या प्रमुखांशी चर्चा झाली, त्यांनी प्रोडक्शन वाढवण्यावर सकारात्कमकता दाखवलीये. सध्या रुग्णालयात बेडची कमतरता भासत आहे, पण आता बेड वाढवण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
👉12 कोटी लोकांचे लसीकरण झाले - मोदी पुढे म्हणाले की, भारतात भारताने तयार केलेल्या लसीने सर्वात मोठी लसीकरण मोहिम झाली. यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहचवण्यात आली. जगात सर्वात वेगाने 10 नंतर 11 आणि आता 12 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
👉18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार-  लसीकरणाबाबत आम्ही महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार आहे. आता भारतात तयार होणाऱ्या लसींचा अर्धा भाग राज्यांना मिळणार. आधीप्रमाणे सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस मिळत राहील. याचा फायदा गरीब आणि मध्यमवर्गातील लोकांनी घ्यावा. आमचे प्राधान्य जीव वाचवण्यावर आहे.
देशाला लॉकडाउनपासून वाचवायचे आहे
मोदी पुढे म्हणतात की, आज देशाला लॉकडाउनपासून वाचवायचे आहे. मी राज्य सरकारांना आवाहन करतो की, त्यांनी लॉकडाऊनला अखेरचा पर्यात म्हणून पहावे. मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष्य केंद्रित करावे. आम्ही आपली अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे आरोग्य सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

Post a Comment

0 Comments