Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नैसर्गिकपेक्षा लसीने येणारी प्रतिकारशक्ती यामुळे ठरते काही पटींनी चांगली


 

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जगात अशा खूप लोकांना वाटते की आपणास संसर्ग झालेला होता आणि आता लसीची गरज नाही. टोरँटो विद्यापीठाचे इम्यूनॉलॉजिस्ट जेनिफर गोमरमॅन सांगतात, “ या लॉजिकमुळे एखाद्या व्यक्तीने कोरोनाला पूर्णपणे हरवले आहे, हे आेळखणे खूप कठीण आहे. अनेकदा शरीरात विषाणू असू शकतो. पुन्हा संसर्ग झाल्याचीही उदाहरणे आहेत. अशा गोष्टी इम्यून रिस्पॉन्सवरही अवलंबून असतात. यासाठी लसीवर आजारास प्राधान्य देणे योग्य निर्णय नाही”. हार्वर्ड टीएच चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थच्या अॅपिडिमियॉलॉजिस्ट बिल हॅनेज यांनी सांगितले, लोकांना खूप थोडा संसर्ग झालेला होता. अशा लोकांत इम्यून प्रोटेक्शन काळाबरोबर कमीही होऊ शकते. अशा लोकांसाठी लसीची इम्युनिटी नैसर्गिक इम्यूनिटीपेक्षा चांगली होऊ शकते.
अनेक प्रकारच्या जीवाणू व विषाणूमुळे होणारे संसर्ग विशेषत: न्यूमाॅकाॅकल जीवाणूपासून होणाऱ्या संसर्गात नैसर्गिकदृष्ट्या मिळालेल्या इम्यूनिटीपेक्षा लस चांगली असते. प्रारंभी संशोधनात समजले की,कोविडसोबत असेच घडू शकते. मॉर्डनाबाबत बाेलायचे झाल्यास स्वयंसेवकांना जी लस देण्यात आली त्यांच्यात कोरोनातून बरे झालेल्यापेक्ष रुग्णांपेक्षा जास्त अँटिबॉडी आढळून आल्या आहेत. तर अनेक आजारांत लसीमुळे जास्त संक्रमण झाल्यानंतर आढळून आलेली इम्यूनिटी शक्तीवर्धक असते. गालगुंड झाल्यानंतर रुग्णांस कायमची इम्युिनटी मिळते. परंतु लसीच्या एक डोसानंतरही हा आजार होतो.

Post a Comment

0 Comments