Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरदेवळेनजिकच्या बोरुडे मळ्यात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता पाळून नागरदेवळेफाट्यानजीक बोरुडेमळ्यात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुय्यम निबंधक दिलीप गायकवाड हे होते . यावेळी श्री गायकवाड, युवानेते सचिन गुलदगड व उद्योजक राजेंद्र बोरुडे आदिंनी आपल्या भाषणात महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य व शिक्षणकार्या विषयी माहीती दिली. यावेळी शिक्षक अरुण वाघुले, सागर गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे ,ओम गायकवाड,ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे आदिसह नागरिक सोशल डिस्टिंगचे नियम पाळून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments