Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागपूर येथील स्मशानभूमी मध्ये कोरोना रुग्णांवर सुरू असलेले अंत्यविधी त्वरित थांबवा- दत्ता पा. सप्रे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नागपूर अमरधाम स्मशानभूमी ही खाजगी मालकाच्या जागेवर आहे. या जागेचे उतारे त्या मालकाच्या नावाने निघत आहे. सदरची स्मशानभूमी ही अहमदनगर महानगर पालिकेने ताब्यात द्यावी तसेच ही स्मशानभूमी अत्यंत दुरावस्थेत आहे.प्रथमता अमदनगर महानगरपालिकेने या स्मशानभूमीची दुरुस्ती,देखभाल,सुशोभीकरण करावे जेणेकरून कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीतून या भागामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. अनेक दिवसांपासून या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यविधी सुरू आहे त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही नागरिकांना श्वास घेण्यास अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत असल्यामुळे कोरोना रूग्णांवर चालू असलेले अंतविधी ताबडतोब थांबवावे या भागातील नागरिकांचा अंतविधीस तीव्र विरोध असून कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,अश्या इशाराचे निवेदन मनपाचे उपायुक्त राऊत यांना देण्यात आले यावेळी भागचंद भाकरे उपस्थित होते.

दत्ता पाटील सप्रे पुढे म्हणाले की, नागापूर अमरधामाची दुरवस्था झाल्यामुळे या ठिकाणी अंत्यविधी करण्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदरची जागा ही खाजगी मालकीची आहे त्यामुळे या स्मशानभूमीचे काम कुठल्याही शासकीय निधीतून करता येत नाही यासाठी महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन सोययुक्त अमरधाम तयार करावे त्यानंतर या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण यांचा अंत्यविधी करावा असे
 ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments