Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फरार तलाठी देशपांडे, तरटे व मंडळाधिकारी धसाळ यांच्या जागी नव्याने अधिकारी नियुक्त करा ; नागरिकांची मागणी
 सावेडी,नागापूर तलाठी कार्यालयात अधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- सावेडी महाराष्ट्र बँक शाखेची पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी चार जणांसह सावेडी तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे व नागापुर तलाठी संदीप किसान तरटे आणि मंडळ अधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ ढसाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून 10 ते 15 दिवसांपासून अटकपूर्व जामिनासाठी तलाठी व मंडळाधिकारी प्रयत्न करत आहेत. ते सर्व फरार असताना त्यांचा चार्ज अन्य अधिका-याकडे न दिल्याने नागरिकांना उता-यासह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळत नाहीत. फरार तलाठी व मंडल अधिकारी यांच्या जागी पर्याय अधिकारी नियुक्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दि. 25 मार्च रोजी सावेडी महाराष्ट्र बँक शाखा अधिकारी सागर अंबिकाप्रसाद दुबे यांनी दिलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार अशोक मदनलाल मावळ, पंकज अशोक मावळ, भरत अशोक मावळ, म मृदुल मावळ (सर्व रा. भिस्तबाग अहमदनगर) या सर्वांसह तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे (सावेडी), तलाठी संदीप किसन तरटे (नागापूर) आणि मंडळ अधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ ढसाळ या सर्वांवर 5 कोटी 1 लाख 84 हजार 614 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. तलाठी देशपांडे व तलाठी तरटे यांना हाताशी धरून मालमत्तेसंदर्भातील फेरफार बेकायदेशीरपणे मंजूर करून घेऊन महाराष्ट्र बँक सावेडी शाखेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे तलाठी हे फरार आहेत. असे असतानाही या दोघा तलाठ्यांचा चार्ज काढण्यात आला नसून पर्याय अधिकारी सावेडी व नागापूर येथे देण्यात आले नाहीत. यामुळे तलाठी कार्यालया संदर्भातील महत्त्वाच्या कागदपत्रे नागरिकांना मिळत नसल्याने मोठी गैरसोय झाली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जातीने लक्ष घालून सावेडी व नागापूर येथे नव्याने अधिकारी नियुक्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments