Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कापडबाजारात चो-या करणारा जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - कापडबाजारात गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील मोबाईल व दागिने चोरणारा चोरटा पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हरी कल्याण भोसले (वय 42 रा. भानसहिवरा ता. नेवासा जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 9 फेब्रुवारीला कापडबाजारात झालेल्या चोरीबाबत एका महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील चोरटा हरी भोसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भानसहिवरा (ता. नेवासा) येथे बसस्थानक परिसरात पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. भोसले याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. मुद्देमालापैकी त्याच्याकडून सॅमसंग मोबाईल जप्त केला. मुद्देमालासह आरोपी भोसले याला पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकाॅ दत्तात्रय हिंगडे, पोना सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकाँ सागर सुलाने, चापोहेकाँ उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments