Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रने रेमडेसिवीरची निर्यात थांबवली ; काळा बाजार रोखण्याचे आदेश


 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 नवी दिल्ली - वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. हे इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तुंची निर्यातदेखील बंद करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढली. येणाऱ्या काळात याची मागणी अजून वाढू शकते, यामळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हे इंजेक्शन तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांना आपल्या वेबसाइटवर स्टॉकिस्ट आणि डिस्ट्रीब्यूटर्सची नावे देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ड्रग्स इंस्पेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्याकडील स्टॉकचे व्हेरिफिकेशन करणे आणि ब्लॅक मार्केटिंग थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, रेमडेसिवीरचे प्रोडक्शन वाढवण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स कंपन्यांच्या संपर्कात आहे.

Post a Comment

0 Comments