Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वैभव कॉलनीतील समस्या दूर करण्याची राहिवास्यांची आयुक्त व महापौरांकडे मागणी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर :- वार्ड क्रमांक ५ मधील वैभव कॉलनी येथे गेल्या १ आठवड्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे त्यामुळे येथील राहिवास्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या भागात त्वरित शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी वैभव कॉलनी येथील राहिवास्यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे व पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

आ. संग्राम भैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत दिघे यांच्या  शिस्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यावेळी दादा वाघ, अजयकुमार गुप्ता, शेखर काळे, मंगलेश गुप्ता व वैभव कॉलनी येथील रहिवासी मंदाकिनी दिघे, पद्मा कुलकर्णी, शुभांगी केसकर, अश्विनी वैद्य, स्मिता पिपाडा, अंकिता देवचके, आरती वाघ, जयश्री राऊत, सुवर्णा पवार, तृप्ती चव्हाण, शारदा वैद्य, निता चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
मार्च च्या शेवटच्या आठवड्यात महानगर पालिकेच्या वार्ड क्रमांक ५ मधील वैभव कॉलनी परिसरात बंदिस्त पाईप गटार योजनेचे काम अत्यंत घाई घाईने करण्यात आले. यावेळी जुन्या ड्रेनेज लाईनचे पाईप जे सी बी च्या साहाय्याने काढतांना या भागातील पिण्याचे पाणी पूरवठा करणारे पाईप व नळ जोड अनेक ठिकाणी उखडले गेले. त्यामुळे हे संपूर्ण पाईप लाईन येथील नागरिकांना स्व खर्चाने बदलून घ्याव्या लागल्या. त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड येथील राहिवास्यांना सोसावा लागला. 
श्री संत गाडगेबाबा वसतिगृह ते वैभव कॉलनीतील शेवटच्या अपार्टमेंट कडे जाणारा ५०० मिटर लांबीचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वैभव कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करावे तसेच रामेश्वर मंदिर परिसर व वैभव कॉलनीतील रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रीट लाईट एल.इ. डी. व हायमॅक्स बसविण्यात यावेत. या परिसरात पूर्ण दाबाने पुरेशा प्रमाणात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. 
वैदूवाडी ते वैभव कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये टाकण्यात आलेले खडी, वाळू, विटा व सिमेंट हे बांधकाम साहित्य ताबडतोब हटवून हा रस्ता वैभव कॉलनीतील राहिवास्यांच्या रहदारीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या बाबत येत्या आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास वैभव कॉलनीतील नागरिक महापौर व आयुक्तांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 
याबाबत विक्रांत दिघे, पद्मा कुलकर्णी, अंकिता देवचके, स्मिता पिपाडा यांनी आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे व पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली असता येत्या २ दिवसात आपल्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे. 


Post a Comment

0 Comments