Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख यास जन्मठेप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख यास न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे.
शहरातील उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचे कोठला परिसरातून अपहरण झाले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात रजि.नं.41/2019 भादवि कलम 363,364(अ),34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगर पोलिसांनी अपहरणकर्त्यांची माहिती काढून अपहरण झाल्यानंतर काही तासातच हुंडेकरी यांची सुखरूप सुटका करून आरोपी अजहर मंजुर शेख, निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख यांना अटक केले होते. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सागर पाटील व तत्कालीन डिवायएसी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि पिंगळे यांनी तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले.सदर प्रकरणात ॲड.पवार ए.बी. यांनी सरकारी पक्षाची बाजी मांडली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक कुमार भिलारे यांनी आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून स फौ लक्ष्मण, पोहेकाँ थोरात, पि डी जे कोर्ट पैरवि अधिकारी नगर शहर यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments