Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत साध्या पद्धतीने जयंती केली साजरी.

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहेत. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचे काम केले, आपल्यावर कोरोनाचे आलेले संकट लवकरात-लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड चौकातीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जया गायकवाड, माया कोल्हे, अशोकराव गायकवाड, अजय साळवे,जयंत गायकवाड आदी उपस्थित होते.

केडगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक राहुल कांबळे यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने जयंती साजरी केली यावेळी अंजली कांबळे, अक्षरा कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल कांबळे म्हणाले की, समाजामध्ये समता, एकता, बंधुत्वता निर्माण करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले त्यांचे विचार आजच्या समाजाला दिशादर्शक आहे आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करणे हीच खरी काळाची गरज आहे. लवकरच केडगाव येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण तसेच सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव केला असून लवकरच सदरचा प्रश्न मार्गी लागणार असे ते म्हणाले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक येथे संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना गौरव गव्हाळे,संभाजी पवार, महाळू शिपनकर,छोटू सुपेकर,नंदू लांडगे,अरुण नानेकर,अनिल येलमाने,बाळासाहेब ठाणगे,प्रतिक जाधव,गणपत वाघमारे,योगेश गायकवाड,संकेत गव्हाळे,यश जधाव, प्रवीण औटी,सागर जंगम, मुस्ताक शेख,शरद दळवी,राहूल कांबळे आदी उपस्थित होते.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे आंबेडकर नगर मित्र मित्र मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे स्वराज्य कामगार संघटनेचे दत्ता तापकीरे, मंडळाचे अध्यक्ष अभिजीत भिंगारदिवे, उपाध्यक्ष प्रमोद थोरात, सुजित घंगाळे, बबलू नवगिरे, संतोष भिंगारदिवे, धर्माच्या चाबुकस्वार, प्रकाश विधाते, शुभम भिंगारदिवे,सागर मिसळ,रोहित केदारे आदि उपस्थित होते.

संकलन: फोटोग्राफर लहू दळवी 

Post a Comment

0 Comments