Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांची वंजारी सेवा संघाच्या प्रदेश संपर्क प्रमुख पदी निवड

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
संगमनेर - अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील राजकिय व सामाजिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या खळी गावातील सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण लक्ष्मण उगलमुगले यांची वंजारी सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली.

वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर,प्रदेश अध्यक्ष विठ्ठलराव गीते,महासचिव बाजी दराडे,कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, महिला आघाडी प्रमुख डॉ. मंजुषा दराडे,कार्याध्यक्ष सविता मुंढे, युवा आघाडी प्रमुख प्रकाश आव्हाड यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ऑनलाइन मिटिंग मध्ये जाहीर निवडीद्वारे समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांची निवड महाराष्ट्र राज्याच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली.समाजभूषण लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांच्या निवडीने एक नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.निवडीला उत्तर देतांना लक्ष्मणभाऊ उगलमुगले म्हणाले की.मी वंजारी समाजात जन्माला आल्याने समाजाची सेवा करणे. समाजाचे संघटन करणे.समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात न्याय मिळवून देणे.वंजारी समाज हिताचे सामाजिक उपक्रम राबविणे.वंजारी आरक्षण लढा तीव्र करणे.वंजारी सेवासंघाची देशपातळीवर संघटन व ताकद निर्माण करणे.वधुवर मेळावे आयोजित करणे.हे माझे आद्यकर्तव्य आहे.वंजारी सेवा संघाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून समाजसेवा करणार असे त्यांनी सांगितले.लक्ष्मणभाऊ उगलमुगले यांच्या निवडी बद्दल माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोरभाऊ दराडे,आमदार संतोष बांगर,आमदार रत्नाकर गुट्टे,माजी आमदार बाळासाहेब सानप,माजी आमदार तोताराम कायंदे, उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे,उद्योगपती विश्वनाथ घुगे यांनी अभिनंदन केले.
निवडीच्या वेळी ऑनलाइन मिटींगला अमोल कुटे, भास्करराव लहाने,बिभीषण पाळवदे,संतोष ताठे, अशोक वडे,सुधाकर मुंडे,अश्विनीकुमार सानप,सोपान शेकडे, धनंजय मुंडे,सूर्यकांत मुंढे,अनिल कहाळे,भाऊसाहेब घुगे, गुणवंत जाधवर, विशालराव बुधवंत,बाजीराव काकड,विष्णू जाधवर,अभिजित माळवे,भाऊसाहेब मिसाळ, डॉ.अमोल कुटे,नारायण जायभाय,व्यंकटराव बडे,लक्ष्मण मिसाळ, बाळा केंद्रे, शामराव गीते,ज्ञानोबा नागरगोजे, शिवाजी जाधवर,केशव फुंदे, मानसिंगराव माळवे,संजय काळबांडे,राजेश केकान, दिनेश केकान,नितीन गर्जे, जितेंद्र केदार,नरेंद्रकुमार सोनुने आदी उपस्थित होते.

संकलन : महादेव गिते (परळी)

Post a Comment

0 Comments