Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर छापे ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यातील वाळकीत दोन ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर नगर तालुका पोलिसांनी छापे टाकून दारू जप्त केली आहे. दोन्हीही कारवाई सपोनि राजेद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका पोलिसांनी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील वाळकी येथे राहत्या घराजवळ लक्ष्मण नाना गोरे दारू विक्री करताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी गोरे यांच्याकडून 2 हजार 210 रु किं चया मग डॉल रम च्या 17 कॉर्टर 180 मिली च्या प्रत्येकी 130 रु कि च्या आहेत. 50 हजारांची रु कि ची ॲक्टिवा गाडी न (MH-16,CP-2255) ताब्यात मिळून आली. 6 हजार 290 रु कि च्या रॉयल स्टाग कंपनीच्या 37 कॉटर 180 मीलीच्या प्रत्येकी 170/- रु कि. चा एकूण 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तर वाळकी येथेच योगेश मच्छिंद्र कासार हा घराच्या ओडशाला 6 हजार 110 रु किं च्या मगडॉल रम कंपनीच्या 47 सीलबंद कॉर्टर 180 मिली च्या प्रत्येकी 130 रु कि व 1 हजार 50 रु कि च्या मॅकडॉल नं 01 व्हिस्की कंपनीच्या 07 सीलबंद कॉटर 180 मीलीच्या प्रत्येकी 150 रु कि. च्या असा एकूण 7 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही घटनेबाबत पोकॉ संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्याचे महाराष्ट्र पोलिस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments