Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसून मारहाण व लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांनी छडा लावून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्यांच्या ताब्यातून धारदार शस्त्र तसेच मोबाईल असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली.
आरोपीमध्ये राभम भागाजी बुगे (रा. बुगवाडी, ता. पारनेर, जि.अ.नगर) व साथीदार विनोद सुधाकर पाटोळे. (रा. बहिरवाडी, जेऊर, ता. नगर, जि. अनगर ,) आकाश संतोष नायकी, (रा.जामगांव, ता, पारनेर, जि. अनगर ) व एक विधी संघर्षीत बालक असे त्यांची नावे आहे.
माहिती अशी की, अंबरनाथ सांगळे हे दि. २ एप्रिल रोजी सुमारास त्याना एका कारने माळीवाडा बसस्थानक येथून प्रवासी म्हणून बसून निमगाव वाघा शिवार येथे घेेऊन  जाऊन लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने काढून घेतले. तसेच दि. ४ एप्रिल रोजी एटीएम त्यासंदर्भातील गुन्हा दाखल होता.
गुन्ह्यातील वापरलेलो होन्डासिटी कार व आरोपी हे पारनेर व जामगाव परिसरातील असल्याचे पोलिसांना खब-याद्वारे माहिती मिळाली, सदरचे आरोपी हे नेप्तीरोडने येणार असल्याच्या माहिती वरून कोतवाली पोलिसांनी सापळा लावून त्याना मोठ्या शिताफीने पकडले. त्याची कसून तपासणी केल्यानंतर त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांनी एमआयडीसी पोस्टे, हद्दीत व नगर तालुका पो.स्टे. हहोत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन वरील हकिकती प्रमाणे एमआयडीसी पो.स्टे. गुरनं. २३०/२०२१ भादवि कलम ३९२,३४ व नगर तालुका पो.स्टे गु.र नं. १६६/२०२१ भादवि कलम ३९४.३४ प्रमाणे गुन्हे व कोतवाली पोस्टे गुरनं २८१/२०२१ भादवि ३९४.३४ व २८०/२०२१ भादवि ३९४.३४ प्रमाणे उघडकिस आलेले आहेत. व त्याचे कड़े एक होन्डासिटी कार, लोखंडी रॉड, कोयता, तीन मोबाईल फोन असे ४.१५,०००/- रु किं चा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दि.३ एप्रिल रोजी फिर्यादी अंबरनाथअर्जुन सांगळे ( वय-४१ रा. सिन्नर जि नाशिक) यांनी फिर्यादी दिली होती.
तसेच पकडलेल्या घेतलेल्या आरोपी मधील आरोपी राभम भागाजी बुगे याच्यावर वर शिर्डी, दौंन्ड, पुणे, मनमाड, दादर रेल्वे सीएसटी रेल्वे, कोतवाली पोस्टे , एमआयडीसी, नगर तालुका पोस्टे अशा एकूण २२ गुन्हे दाखल आहेत. तर विनोद सुधाकर पाटोळे याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. तर आकाश संतोष नायकी याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे हे चोरी व जबरी चोरी संदर्भातील आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सपोनि विवेक पवार हे करित आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर व गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना गणेश धोत्रे, पोना विष्णु भागवत, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सागर पालवे, पोकाँ भारत इंगळे, पोकाॅ सुमित गवळी, पोकाॅ  योगेश कवाष्टे, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकाॅ तान्हाजी पवार, पोका सुशिल वाघेला, पोकाॅ सुजय हिवाळे, पोकाॅ प्रमोद लहारे, पोकाँ सोमनाथ राऊत, पोकाॅ प्रशांत राठोड ( मोबाईल सेल ) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments