Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार काँग्रेसचे स्व.आर.आर. पिल्ले कुटुंबीयांचे ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांत्वनऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : : भिंगार ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्व. आर. आर. पिल्ले यांच्या कुटुंबीयांची महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी भेट घेत सांत्वन केले. ना.थोरात नगर शहराच्या दौऱ्यावरती आले असता त्यांनी भिंगार येथे पिल्ले कुटुंबीयांची भेट घेतली. 
यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे, श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे आ.लहू कानडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते दीप चव्हाण, नगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदी उपस्थित होते. 
स्व. आर. आर. पिल्ले यांचे चिरंजीव इंजिनियर शुभम पिल्ले तसेच पिल्ले यांच्या पत्नी यावेळी उपस्थित होत्या. ना.बाळासाहेब थोरात यांनी पिल्ले यांच्या आठवणींना या वेळी उजाळा दिला. 
यावेळी बोलताना ना.थोरात म्हणाले की, पिल्ले हे काँग्रेस पक्षाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांनी पक्षाची साथ कधी सोडली नाही. कोरोना महामारीचे संकट अत्यंत गडद झाले आहे. अनेक सहकारी कोरोनाने आपल्यातून गेले. पिल्ले यांचे अकाली निधन ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पिल्ले यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.  यावेळी ना.थोरात यांनी पिल्ले कुटुंबीयांना काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. आ.डॉ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांनी देखील यावेळी पिल्ले यांच्या दुःखद निधना बद्दल शोक व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments