Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वृद्ध महिलेच्या खुनातील फरार आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - एप्रिल 2019 मध्ये अहमदनगर येथील लालटाकी या ठिकाणी किरकोळ वादातून वृद्ध महिलेचा खून झाला होता. या खून प्रकरणातील गेल्या तीन वर्षापासून फरार असणा-या आरोपीस नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. सुनील उर्फ डुग्या रघुनाथ शिंदे (वय 28 रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. 
आरोपी शिंदे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात 452, 354, 324, 143, 147 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो फरार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ. बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके पोना संदीप पवार, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, पोकॉ. कमलेश पाथरूट, चापोहेकाँ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments