Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुन्हा दाखल करा, मागणीवर खा.डाॅ.विखे यांनी दिली प्रतिक्रिया....

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना काळ्या बाजारातुन खरेदी केल्याने तुमच्यावर सामाजिक कार्यकर्ते यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, यावर  मंगळवारी (दि.27) सकाळी नगर जिल्हाधिकारी कार्यालयास आले असता खा. डॉ सुजय विखे यांनी पञकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

👉अशी होती मागणी...
खा. डॉ सुजय विखे यांनी १०,००० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब नाही अश्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अॅड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.
खासदार डॉ सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली.
शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. सदर साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थान च्या रुग्णालयाला व राहता येथील सरकारी दवाखान्याला देखील देखील वाटप केले.
आज दि. २६.०४. २०२१ रोजी, यांनी सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा तत्काळ शासनाने जप्त करावा व अहमदनगर जिह्यातील गरजू रुग्णांना जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या मार्फत समन्याय पद्धतीने वाटप करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आली.


Post a Comment

0 Comments