Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरांमध्ये रेमडेसिविर तुटवडा होऊन दिला जाणार नाही- आमदार संग्राम जगताप

 


जिल्हा प्रशासनाकडे केले रेमडेसिविर 
इंजेक्शन सुपूर्त
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- एक वर्षापासून गेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग महाराष्ट्र मध्ये उद्रेक करत आहे.त्यामुळे नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यातच संपूर्ण महाराष्ट्र भर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसले आहे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार याच्या कडे मागील वर्षी ही रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना फोन केला असता त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. मागील तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासोबत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा बाबत बैठक घेण्यात आली होती यावेळी असे निदर्शनास आले के जिल्हा भरातून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.नगर शहरामधील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार त्यांना फोन केला असता या वर्षी ही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले व कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्यामार्फत नगर शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन पाठवण्यात आले.तसेच यावेळी त्यांनी सांगितले की औषधांचा तुटवडा कमी पडू दिला जाणार नाही असे शाश्वत आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे रेमडेसिविर इंजेक्शन प्रशासनाकडे आ.संग्राम जगताप यांनी सुपूर्त केली यावेळी सुजित काकडे उपस्थित होते.
यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले की नगर शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बाबतचा प्रशासनाकडून दररोज आढावा घेऊन मी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्कात असून कुठलेही औषध कमी पडून देणार नाही असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments