Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कादंबरी वसाहतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवा ; महानगरपालिकेकडे नागरिकांची मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर - शहरातील वार्ड नं 1 मध्ये महानगरपालिकेचे सर्व नियम व अटींची पूर्तता करून पाणीपट्टी-घरपट्टी नेहमी गेली अनेक वर्षांपासून भरत आहे, असे असताना ही कादंबरी वसाहत क्र 4 मधील नागरिकांना मनपाच्या पाईपलाईन मधून पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याची समस्या आमदार संग्राम जगताप, स्थानिक चारही नगरसेवकांचा समोर नागरिकांनी मांडली आहे. असे असतानाही अद्यापही या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली नसल्याची खंत कादंबरी वसाहतीतील नागरिकांनी 'नगर रिपोर्टर'शी बोलताना व्यक्त केली.

वास्तविक पाहता अहमदनगर महानगरपालिकेच्या वार्ड नंबर 1 मध्ये नगरसेवक संपत बारस्कर हे विरोधी पक्ष नेते आहेत तर उर्वरित अन्य तीन नगरसेवकही आहेत, असे असतानाही पिण्याची पाण्याची समस्या अद्यापही सुटली नाही. यापूर्वीही वार्ड नं. 1 मधील कादंबरी वसाहत क्र.4 च्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याबाबत मनपा आयुक्त, स्थानिक नगरसेवक यांना समस्या मांडली. या मंडळींनी तात्पुरती समस्या सुटण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिली. परंतु अद्यापही मनपाच्या पाईपलाईन मधून पिण्याच्या पाणी नागरिकांना मिळत नाही. पाणीपट्टी व घरपट्टी वर्षानुवर्ष महानगरपालिकेत नागरिक भरत आहेत. परंतु पाइपलाइनमधून पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात नागरिकांना अद्यापही मिळत नाही. या परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासाठी कादंबरी वसाहत नागरिकांना वणवण फिरावे लागते. महानगरपालिकेने क्र.4 कादंबरी वसाहतीतील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी कादंबरी वसाहतीतील डी.जे सातपुते, विनायक ऊरुणकर, धनंजय बगाडे, अजित लावरे, रोहिन वैद्य, मनोज धाडगे, राहुल कुलकर्णी, बबन वाघ, राजेंद्र कल्हापुरे, अमोल बन, श्री.कोलते, श्री.माळवे, श्री.सोनटक्के, श्री. साठे, श्री. भावसार, श्री. सुपेकर, श्री. कासार आदींसह नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments