Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जतकरांसाठी खाकिवर्दीतले जाधव आणि यादव ठरतायत संकटंमोचक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर  
👉(ॲड राहुल मते)
आजपर्यंतचा कर्जत तालुक्याचा खाकी वर्दीचा आपण जर इतिहास पाहिला तर आपल्या असे लक्षात येते की पोलीस हा आजपर्यंत फक्त टीकेचा धनी ठरला आहे परंतु तरीदेखील संपूर्ण प्रशासनामध्ये एकमेव असा माणूस आहे ज्याने आपल्या वरती कितीही टीका टिप्पणी झाली तरीदेखील आपण करत असलेल्या कामाकडे कधी पाठ फिरवली नाही खरं तर आज आपण आपल्या घरात अतिशय सुखरूप बसलेलो आहोत याच एकमेव कारण म्हणजे खाकी वर्दीतला देव माणूस परंतु पोलिस प्रशासनाला सुद्धा घर संसार असतो ही गोष्ट कदाचित आपल्या लक्षात नसेल, त्यांची घरी राहण्याची इच्छा असताना देखील त्यांना घरी राहता येत नाही करोनाच्या काळात आपण बाहेर पडताना दहा वेळा विचार करतो परंतु पोलीस आपलं घर दार आई-वडील बायका मुलं यांची व आपल्या जीवाची कसलीही परवा न करता रोज फक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच नव्हे तर तुमच्या आमच्या जीवाची काळजी घेण्यासाठी बाहेर पडतात..... 
ऑक्टोबर महिन्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून अण्णासाहेब जाधव यांनी कर्जत मध्ये आपला कार्यभार हाती घेतला खरतर गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात अतिशय कठीण व खडतर प्रसंगात काम केलेले अधिकारी यांचा राज्य व केंद्र शासनाने वेळोवेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान केला आहे असे कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या तालुक्याला लाभले हे आपले मोठे भाग्य म्हणावे लागेल ज्यांनी भोर विभागात असताना पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन, माऊलींच्या पालखी सोहळ्या दरम्यान केलेली सेवा, करोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला केले आवाहन मार्गदर्शन व उपायोजना यावरूनच सर्व सामान्य जनते विषयी असलेली आपुलकी लक्षात येते.आपल्या खाकीवर्दीच्या माध्यमातून केलेल्या या खऱ्या समाजसेवेची शिदोरी आपण आपल्या सोबत घेऊन आलात आणि आमच्या तालुक्याचा कार्यभार हाती घेतला आणि तेव्हापासून दोन्ही तालुक्यांमध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी अन्याय सहन करणाऱ्या लोकांना खरा वाली मिळाला.खरं तर समाजामध्ये असा भ्रम झाला आहे की पोलिस म्हणजे फक्त दंडुकेशाही दडपशाही आणि खाकीवर्दीचा दाखवला जाणारा रुबाब यामुळे सर्वसामान्य जनता पोलीस स्टेशनची पायरी चढताना अगदी विचार करूनच पायरी चढत असते परंतु जाधव यांनी पदभार हाती घेतला आणि काही दिवसातच आपल्या चांगल्या कामाच्या माध्यमातून दंडुकेशाही दडपशाहीला लगाम लावत आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात एक प्रकारची आस्था तयार केली.सर्वसामान्य जनतेच्या मनात आस्था तयार करणं हे इतकं सोपं काम नाही ते काम करण्यासाठी आपलं कामही तसं असावं लागतं.आणि हे काम करण्यासाठी एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाची साथ जर मिळाली तर हे काम काम न वाटता ती एक प्रकारची सेवा होऊन जाते..... 

आणि हीच सेवा करण्यासाठी पूर्वी बारामती या ठिकाणी कार्यरत असताना ज्यांनी आपल्या दबंग शाहीच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीला आळा घातला बारामतीत असताना कोळविहिरे दरोडा प्रकरण असेल गणेशोत्सवात केलेली कामगिरी असेल घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना घडविलेली अद्दल असेल, गांजा सप्लाय करणाऱ्यांच्या आवळलेल्या मुसक्या, दौंड मध्ये वाळू माफियांवर केलेली विशेष कारवाई व वर्धा जिल्ह्यामध्ये बहुचर्चित बँक चोरी प्रकरणात केलेली उत्कृष्ट कामगिरी असेल करुणा च्या काळात करुणा चा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना किराणा भाजीपाला दूध इत्यादी घरपोच मिळवण्यासाठी आपल्या डोक्यातल्या कल्पकतेने तयार केलेले उत्कृष्ट नाविन्यपूर्ण मोबाईल ॲप्लिकेशन असेल त्याच बरोबर करुणा च्या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटका वाहतूक करणाऱ्या वर केलेली कारवाई असेल आणि या सर्व कारवाईच्या माध्यमातून आपले खाकीवर्दी प्रती असलेली निष्ठा आणि सर्वसामान्य प्रती असलेली तळमळ लक्षात घेता आपला यथोचित सन्मान महाराष्ट्राची आई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते कोल्हापूर या ठिकाणी झाला आणि या सन्मानाचा दरम्यान ताईंनी एक वाक्य उद्गारले होतं त्या म्हणाल्या होत्या तुमची ज्या वेळेस बदली होते त्या त्या वेळेस त्या ठिकाणची लहान लहान मुले आणि मुली आणि महिलांच्या डोळ्यात पाणी येते हे उद्गार तुम्ही केलेल्या कामाची पावती देतात, याबरोबरच बारामती विभागात सर्वात मोठ्या कारवाया करून 161 गुन्हे दाखल करुन 16 कोटी 74लाख रु किंमतीचा माल जप्त केल्याबद्दल IAS जयंत मीना यांनी प्रशस्तिपत्र देऊन केलेला सन्मान असेल 2006पासुन केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन केलेला गौरव असेल असे एक ना अनेक सन्मान तुमचा आत्मविश्वास वाढवणारे आहेत... याच सन्मानाच्या जोरावर आणि काम करण्याच्या पद्धतीने अतिशय कमी वेळात राम लखण च्या जोडी प्रमाणे जाधव आणि यादव या जोडीने कर्जत तालुक्यामध्ये सर्वसामान्यांची मने जिंकण्यास सुरुवात केली आणि कर्जतकरांच्या मनांमध्ये एक प्रकारे आपुलकीचं घर तयार केलं..........आम्ही कर्जतकर पूर्वी टीव्ही मध्ये सिंघम चित्रपटा सारखे जनतेच्या कामात येणारे पोलीस पाहायचो आता आम्हाला या सर्व गोष्टी रोज पाहायला वाचायला ऐकायला मिळायला लागल्या आणि कर्जत करांचा पोलिसांप्रती असणारा आदरभाव आणि आदरयुक्त भिती वाढण्यास सुरुवात झाली यामध्ये लग्नाची बनवेगिरी करून लाखो रुपये लुबाडणाऱ्या टोळीला जेरबंद करून सर्वांना सामान्यांचे होणारे लुट थांबवली, ऑनलाइन अभ्यासाच्या माध्यमातून चॅटिंग करून अल्पवयीन मुलीस पळवणारे आरोपी जेरबंद, वाळू माफियांवर कर्जत पोलिसांची मोठी कारवाई,दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद, सावकारकी च्या माध्यमातून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक करणारी टोळी जेरबंद.शेतीपंप चोरणारी टोळी पकडली, मोटरसायकल चोरणारे जेरबंद, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगरमध्ये घडलेल्या जरे हत्याकांड या प्रकरणात आरोपीस पकडण्यात तुमची नियुक्ती केल्यानंतर तुम्ही त्यास कशा पद्धतीने जेरबंद केले हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले अशा प्रकारच्या दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यातील बातम्या आम्ही रोज वाचू लागलो आणि पाहू लागलो, आणि कर्जतकरांचा खाकीवर्दीवरील विश्वास वाढायला लागला.आणि हो फक्त कारवाई करुन थांबतील ते जाधव आणि यादव कसले त्यांनी याही पुढचे पाऊल टाकले ते म्हणजे गुन्हेगारांचे मनपरिवर्तन करणे आणि ते मनपरिवर्तन करण्यासाठी जे उपक्रम त्यांनी राबवले ते खरंच कौतुकास्पद आहेत आणि आत्ता सध्या करोणाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देखील पोलीस प्रशासन सतर्क होऊन जे काम करत आहे, रुग्णांच्या अडचणी जाणून घेत आहेत हे खरंच अतिशय कौतुकास्पद बाब आहे. सध्या करोनाच्या संकट काळात कुटुंब सांभाळत करोनाशी लढणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव आणि पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व १०एप्रिल रोजी पहाटे चोरी करताना आमचे मामा खंडू गरड व भरत बर्डे यांच्यावरती चोरट्यांनी जो गोळीबार केला त्या आरोपींचा अतिशय शिताफीने शोध घेत त्यांना अटक केल्याप्रकरणी त्यांच्या संपुर्ण टीमला महाराष्ट्र पोलिसांना आम्हा कर्जतकरांचा सलाम .योग्य वेळी येथोचीत सन्मान नक्कीच करु.

Post a Comment

0 Comments