Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनाचे नियम न पाळल्याने भारतात परिस्थिती बिघडली : जागतिक आरोग्य संघटना

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
जिनव्हा - भारतामधील भंयकर कोरोना लाटेमुळे विषाणूचे केवळ एक म्युटेशन जबाबदार नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक पहिली लाट ओसरताच मोठमोठ्या सभा, प्रचंड गर्दीचे सोहळे, कोरोनाचे अनेक व्हेरिएंट व मंदगतीने होणारे लसीकरण यामुळे भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे परखड मत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नोंदवले आहे.

भारतात आलेल्या कोरोना सुनामीसाठी केवळ एक म्युटेशन जबाबदार नाही. कोरोनाचे नियम पाळले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या काही आठवड्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारेव्हिव यांनी लक्ष वेधले.
कोरोना रुग्णांपैकी केवळ १५ टक्के लोकांना रुग्णालयात उपचारांची गरज पडते. त्यामध्येही अत्यंत कमी रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. मात्र योग्य माहिती मिळत नसल्याने भारतात लोक आपल्या नातेवाइकांना रुग्णालयात भरती करण्याची घाई करीत आहेत. ८५ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात. लोकांना घरगुती उपचाराविषयी माहिती देणे गरजेेचे आहे, असे तारिक म्हणाले. तर अध्यक्ष तेद्रोस अॅडहॉनम घेब्रयासिस म्हणाले की, भारताला ४००० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचा पुरवठा केला जाणार असून २ हजार तज्ज्ञांचा ताफाही भारतात पाठवला जाणार आहे.

भारताचा कोरोना संकटापासून 
बचाव करण्यात जग अपयशी
वॉशिंग्टन - कोरोनासारख्या संकटापासून भारताचा बचाव करण्यात जगातील सर्वच देश पूर्णत: अपयशी ठरले अाहेत, अशा शब्दांत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ.अँथनी फाउची यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गरजू देशांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात धनाढ्य देश अपयशी ठरले. भारतातील विद्यमान स्थिती जगातील हीच विषमता दर्शवते आहे. जागतिक महामारीचा लढा हा वैश्विक एकजुटीनेच केला जाऊ शकतो. कोव्हॅक्स मोहिमेअंतर्गत जागतिक आरोग्य संघटना भारताला तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. धनाढ्य देशांनी ही जबाबदारी निभावली पाहिजे,असे डॉ. फाउची म्हणाले.
Post a Comment

0 Comments