Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उत्तराखंडवर आता वणव्याचे संकट

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
चामोलीत भीषण जलप्रलय अनुभवलेल्या उत्तराखंडवर आता वणव्याचे संकट आहे. यात १२०० हेक्टर वन क्षेत्र जळून खाक झाले आहे. हा वणवा शहरांपर्यंत पोहोचू लागला आहे. वरुणावत पर्वतावर लागलेली आग उत्तरकाशी आणि गढवालच्या चौरासेमधील आग श्रीनगरपर्यंत पोहोचू लागल्याने इशारा देण्यात आला आहे. नैनितालमधील २० जंगलांतही वणवा लागला आहे. उत्तराखंडमध्ये डिसेंबरपासून जंगले धगधगत आहेत. वन विभागाने ही आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.
का भडकते आहे आग?
गेल्या महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे जमीन कोरडी आहे. वाळलेले गवत व पानांमुळे आग भडकत आहे. ती विझविण्यासाठी नैसर्गिक पाण्याचे स्रोत कमी पडू लागले आहेत.


Post a Comment

0 Comments