Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोलिस हवालदार लाच घेताना 'एसीबी' पथकाने रंगेहाथ पकडले ; नगर एसबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- दारु विक्री व्यवसाय सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून 15 हजार रु. लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10 हजार रुपये घेताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार बार्शिकर काळे याला रंगेहाथ पकडण्याची कारवाई नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.27) केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा दारु विक्री व्यवसाय असुन हा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून 15 हजार रु लाचेची मागणी पोह काळे यांनी तक्रारदार यांचेकडे केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारी वरुन दि.26 एप्रिल 2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी पो.ह. काळे यांनी तक्रारदार यांचेकडे 15 हजार रु लाचेची मागणी पंचा समक्ष केली. तक्रारदार यांनी रक्कम कमी करण्यासाठी विनंती केली असता, तडजोड अंती 10 हजार रुपये देण्याचे ठरल्याने आज दि.27 एप्रिल 2021 रोजी आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान 10 हजार रु लाचेची रक्कम पंचा समक्ष कॉटेज कॉर्नर, नगर मनमाड हायवे येथे स्विकारली असता, पो.ह.काळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
नाशिक परिक्षञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, वाचक पोलीस उपअधीक्षक विजय जाधव याच्या मार्गदर्शनाखाली अहमनगर पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक शाम पवरे, पोलीस कर्मचा-यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments