Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बारामतीत बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन ही ३५ हजार रुपयांना विकले ; टोळी गजाआड

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बारामती - ऐन कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात रुग्णांची संख्या वाढत असताना तर दुसरीकडे आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. या भयावह काळात रेमडिसिविरचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामॉल औषधाचे लिक्विड भरून ते रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विक्री करण्याचा खळबळजनक प्रकार बारामती (जि.पुणे) उघड झाला आहे. आला. माणूसकीला काळीमा फसणारी घटना म्हणजे हे बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन ही ३५ हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली.

बारामती तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसिवीर विकणारी टोळी गजाआड झाली आहे.
याप्रकरणी दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, शंकर भिसे आणि प्रशांत घरत या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीरची तातडीची गरज असल्याने त्याने या टोळीतील एका सदस्याशी संपर्क साधला होता. तो एका कोविड सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती.
त्यानुसार इंजेक्शन देणा-याने त्याला शहरातील फलटण चौकात येण्यास सांगितले. एका इंजेक्शनचे ३५ हजार असे दोन इंजेक्शनचे ७० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली होती. पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी सापळा रचून या टोळीतील प्रशांत घरत, शंकर पिसे, दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड यांच्यासह फॉर्च्यूनर गाडी ताब्यात घेतली आहे.
या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. राज्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे. मात्र तरीदेखील इंजेक्शन मिळत नाहीत.
याच संधीचा फायदा घेत या टोळीने बनावट रेमडिसीवीर तयार करण्याची योजना आखली. त्यानुसार कोविड सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसिवीरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल पाण्यामध्ये मिसळून त्याचे लिक्विड बाटलीत भरुन ते बंद केले जात होते.
हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते. रुग्णांच्या जीवाशी त्यातून खेळ केला जात होता. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तक्रार घेत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.
बारामतीत रेमेडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे घेतलेल्या आढावा बैठकीत देखील पोलिसांना अशा काळाबाजार रोखण्यास सूचना केल्या होत्या. त्यानंतरच असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने बारामतीत नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


Post a Comment

0 Comments