Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तोफखाना हद्दीत कुणाच्या आशिर्वादाने अवैधधंद्यांना उधाण ; पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षच !

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर - 'आम्हाला नाही कुणाची भीती' या कवितेच्या ओळी प्रमाणेच तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे तेजीत आहेत. मटका, दारू आणि बिंगो धंद्यांनी चांगलाच जोर धरला असून हे केवळ तोफखाना ठाण्यातील अपवाद पोलीस दादांच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांची पीक जोमाने उभारू लागले आहे. ही सर्व अवैध धंदे कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे.
यापूर्वीच अनेक गुन्ह्याचा तपास प्रलंबित, अवैध धंदेवाल्याकडून माया गोळा  करण्यात व्यस्त असणा-या तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या असमाधानकारक कामगिरीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 'ती'  शाखा बरखास्ती केली.  परंतु या झालेल्या कार्यवाहीनंतर या तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात अवैधधंद्यांना अधिकच जोर धरला आहे. 

यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दारूधंदे तेजीत आले आहे. याबरोबरच मंगलगेट पोलीस चौकी नजीकच मटक्याचा धंदा चांगलाच खुलला आहे. कोंड्यामामा चौक परिसरात दारूधंदे, मटका तेजीत आहे. कोठला परिसरातील दारूधंदे तर ग्राहक भंडाराच्या मागील बाजूस मटका तेजीत आहे. पाईपलाईन रोडवर चार ते पाच ठिकाणी बिंगो धंदेही मोठे तेजीत आले आहेत. हे केवळ तोफखान्यातील काही अपवाद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या अवैध धंद्यांचा बंदोबस्त होईल का? अशी माफक मागणी सामाजिक संघटनांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments