Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कत्तलखान्यावर छापा ; नगर शहर उपविभागीय पोलीस पथकाची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शहरातील झेंडीगेट येथील जनावरांच्या अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो 60 हजाराचे गोवंश मास व 24 लहान-मोठी 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आलेल्या जनावरांची सुटका नगर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या सूचनेनुसार कोतवाली पोलिसांनी केली.
इसरार उर्फ इच्चू मुक्तार कुरेशी, तबेरज आबीद कुरेशी, मुज्जू जानिमिया कुरेशी, तौफिक युनूस कुरेशी ( सर्व रा. झेंडीगेट, अहमदनगर) यांच्यावर भादवि कलम 269, 34 सह महाराष्ट्र प्राणी राक्षा अधिनियम सन 1995 चे कलम 5,5 (क),9(अ) सह प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम सन 1976 चे कलम 11 प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि हेमंत भोंगळे, सपोनि रणदिवे, सतीश शिरसाठ, मनोज कचरे, पोहेकाॅ कदम, साबळे, पोना काळे, हेमंत खंडागळे, पोकाॅ सागर द्वारके, गोरे, हिवाळे, पवार, लहारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments