Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी सैनिक फुंदे खून प्रकरणी चौघांना अटक ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथे हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांचा खून केल्या प्रकरणातील चौघा आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सुधीर संभाजी सिरसाठ ( वय 26 रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (वय 24 रा. शिक्षककॉलनी पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (वय 21 रा. विजयनगर पाथर्डी), गणेश सोन्याबापु जाधव (वय 23 रा. शंकरनगर पाथर्डी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांना आरोपी सुधीर सिरसाठ हा कानडगाव (ता.राहुरी ) परिसरातील डोंगरांमध्ये त्याच्या साथीदारांसह लपून बसलेला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कानडगाव परिसरातची माहिती घेऊन सापळा लावला. या दरम्यान डोंगरांमध्ये पाठलाग करून आरोपी सिरसाठ, वारे, डुकरे व जाधव यांना पकडण्यात आले. या आरोपींना पोलीस खाक्या दाखविताच पळून गेलेल्याचे केतन जाधव ( रा. शिक्षककॉलनी पाथर्डी) असे त्याचे नाव सांगितले. तसेच गुन्हा केल्याची माहिती दिली. यापूर्वी आरोपी डुकरे याच्यावर जेजुरी (पुणे), कराड (सातारा) तर गणेश जाधव याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि मिथुन घुगे, पोहेकाँ मनोज गोसावी, पोना सचिन आडबल, विशाल दळवी, संतोष लोढे, रोहित येमुल, विनोद मासाळकर, जालिंदर माने, मेघराज कोल्हे आणि शेवगाल उपविभागीय पोलीस कार्यालयातील पोना निलेश म्हस्के, पोकाँ भगवान सानप, राहुल खेडकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दि.6 एप्रिल 2021ला सकाळी आरोपी सुधीर सिरसाठ याने मच्छिंद्र कारभारी फुंदे यांच्या टाकळीफाटा येथील साईप्रेम हॉटेल समोरी गाडी उभी केली होती. यावेळी विश्वनाथ फुंदे यांनी आरोपी सुधीर सिरसाठ याला हॉटेल समोरून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपी सिरसाठ याने त्याचे इतर साथीदारांना तेथे बोलावून घेतले. तिलोक जैन विद्यालय,पाथर्डी या शाळेच्या पाठीमागे विश्वनाथ फुंदे यांना आणून जबरदस्तीने दारू पाजून पुन्हा लोखंडी पाइप व रॉडने मारहाण करून त्यांचा खून केला. या मयताचा भाऊ मच्छिंद्र फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात भरावी कलम 302 364 143 147 148 149 323 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments