Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मास्क घट्ट, आरामदायक सर्वात सुरक्षित ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील प्रत्येक सरकार या महामारीला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. दरम्यान, जगातील कित्येक देशांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील सीडीसीने काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. यानुसार, कोरोना महामारीला रोखण्यासाठी मास्क हे सर्वात महत्वाचे उपाय असल्याचे सांगितले आहे.
सीडीसीने नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी चेहरा, हनुवटी आणि नाक झाकणारा घट्ट आणि आरामदायक मास्क सर्वात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच एक्सहेलेशन वॉल्व्हसह व्हेंट मास्कपासून सावध राहण्याचे आवाहनदेखील केले आहे.

👉मास्क संबंधित मार्गदर्शक तत्वे आणि उत्तरे
कोणता मास्क सर्वात चांगला असून शकतो?
सीडीसीच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्नॅग फिट मास्क अधिक चांगला आहे. या काळात असे मास्क वापरा ज्‍यामुळे नाक, हनुवटी आणि चेहरा एकाचवेळी संपूर्ण झाकले जाऊ शकते.
आपले मास्क व्यवस्थित आहे की नाही कसे पाहावे?
जर आपल्याला श्वासोच्छ्वास घेताना आपला मास्क मागे व पुढे सरकत असेल किंवा त्यामधून गरम हवा येत असेल तर तो योग्य आहे असे समजावे. डिस्पोजेबल किंवा कपड्याचा मास्कचा वापर करत असल्यास त्यातील वायर (मेटल स्ट्रिप) नक्की पहा.
आपण कोणत्या मास्कपासून सावध राहावे
सीडीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, आपण एक्सहेलेशन वॉल्व्ह आणि व्हेंट मास्कपासून सावध राहायला हवे कारण यामुळे संक्रमन एका व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहचत असतो. दुसरी काळजी ही घ्यावी की, मास्क वापरताना आपल्याला श्वास घ्यायला अडचण व्हायला नको.
ऐकमेंकावर मास्क घालता येते का?
जर आपण ऐकमेंकावर मास्क घालत असल्यास ते अधिक सुरक्षित असल्याचे सीडीसीचे म्हणणे आहे. परंतु, यामध्ये डिस्पोजेबल मास्कचा वापर करण्यास नकार दिला आहे.


Post a Comment

0 Comments