Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोड्यातील फरार आरोपी जेरबंद ; तोफखाना पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : "तुम्ही काउंटर मधील पैसे द्या आम्ही येथील डॉन आहोत" तुम्ही आम्हाला कपडे फुकट द्यायचे व तुम्ही आम्हाला हप्ता द्यायचा, असे म्हणून गुंडगिरी करणार्‍या व दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. प्रशांत उर्फ मयुर राजू चावरे (वय 24), बंडू उर्फ सुरज साहेबराव साठे (वय 22 दोघे रा. सिद्धार्थनगर अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, सुरज साठे, राहुल झेंडे, अक्षय (पूर्ण नाव माहीत नाही), मयुर चावरे (सर्व रा. सिद्धार्थनगर अहमदनगर) या सर्वांवर तोफखाना पोलीस ठाण्यात भादवी कलम 395, 386, 452, 427, 323, 504, 506 मुंबई पोलीस अधिनियम 142 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी बालिकाश्रम रोड वरील अन्वर स्क्रॅप येथे येणार असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार श्री गायकवाड यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या 'डीबी' पथकाला सूचना दिल्या होत्या. सूचनेनुसार 'डीबी' पथकाने सापळा लावून आरोपी प्रशांत चावरे, सुरज साठे या दोघांना बालिकाश्रमरोडवरील अन्वर स्क्रॅप येथे पकडण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि. सुनील गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार तोफखाना 'डीबी'चे पोउपनि समाधान सोळंके, पोहेकाॅ बि.व्ही. काळे, डी.बी.जपे, पोना व्हि.आर.पठाण, पोकाॅ जावेद शेख, शैलेश गोमसाळे, संतोष राठोड, अनिकेत आंधळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments