Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विकताना दोघे पकडले; 'एलसीबी'ची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणारे दोन आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ज्ञानेश्वर कौतुक हरपे (वय 21 रा. एन-5 सिडको, औरंगाबाद ह. रा. एमआयडीसी अहमदनगर), महेश नारायण कु-हे (वय 26 रा. सावेडी, साईनगर वाघमळा अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दोनजण हे साईदीप हॉस्पिटल (तारापूर,अहमदनगर) परिसरात स्वतःच्या आर्थिक फायदा करता covid-19 आजारावर लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करीत असल्याची माहिती दि. 20 एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पो. नि. अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार श्री कटके यांनी या पथकाला सूचना दिल्या. कारवाईचे नियोजन करून त्याची विक्री करणाऱ्यांचा मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकाच्या मध्यस्थीने संपर्क करून रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत विचारपूस केली असता, त्यासंबंधींनी एक इंजेक्शनची 37 हजार रुपये सांगितले. यावेळी त्या संबंधितांकडून इंजेक्शन खरेदीसाठी हो मिळाला. त्या संबंधितांनी 10 ते 15 मिनिटाने साईदीप हॉस्पिटल अहमदनगर परिसरात या असे सांगितले. यावेळी एलसीबी पथकाने रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी बनावट ग्राहक पाठवून हॉस्पिटलच्या बाहेर सापळा लावून दोघांना दोन पंचासमक्ष पकडण्यात आले. यावेळी पकडण्यात आलेल्या हारपे व कु-हे या दोघांची औषध निरीक्षक विवेक खेडकर व एलसीबी पथकाने अंगझडती घेतली. त्यावेळी त्या दोघांकडून पोलिफॉर्म कंपनीचे एक इंजेक्शन, तीन मोबाइल, रोख रक्कम, एक्सेस दुचाकी असा एकूण 1 लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांकडे अधिक चौकशी केली असता इंजेक्शन हे सुहास जगताप (रा. वांबोरी ता.राहुरी) यांच्याकडून आणले असल्याची माहिती मिळाली. जगताप याचा पोलिसांनी शोध घेतला असता तो वांबोरी येथे मिळून आला नाही. ज्ञानेश्वर हारपे, महेश कु-हे व सुहास जगताप या तिघांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक विवेक खेडकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भादवि कलम 420, 34 सह परिच्छेद 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 सह वाचन कलम 32 (2)(सी) तसेच जीवनावश्यक वस्तूचे अधिनियम 1955 चे उल्लंघन दंडनीय कलम 27 (बी) (ii)कलम 18(ए) व कलम 22 (1) (cca) चे उल्लंघन अनुक्रमे 28 (ए) व कलम 27(डी) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल धुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल खटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि मिथुन घुगे, सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ विश्वास बेरड, पोना सुरेश माळी, पोकाॅ सागर ससाणे, रोहित येमुल आणि औषध निरीक्षक विवेक खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments