Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राहाता तालुक्यात 94 लाखाचा विदेशी दारू साठा जप्त ; नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाची छडकेबाज कारवाईऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यातील राहाता तालुक्यात नगर-मनमाड रोडवर अस्तगाव फाटा येथे गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली अवैध मद्य मोठा साठा घेऊन जाणारा मालवाहतूक गाडी अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली. या कारवाई 94 लाख 88 हजार रुपयांचा अवैध दारू साठ्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. गुड्डु देविसिग भिल (वय ३५ रा. रामुखेडी खुडेल जि.इंदोर, राज्य मध्यप्रदेश) अस पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागास अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार नेमलेल्या विशेष पथक मागील ३ ते ४ दिवसापासून कार्यरत करण्यात आलेली होती. त्यानुसार नेमलेल्या विशेष पथकांनी गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती नुसार मागील चार दिवसापासून गस्तीकामी तैनात असताना आज दि. २७ एप्रिलला सकाळी मिळालेल्या माहितीनुसार नगर-मनमाड रोडवर अस्तगाव फाटा (ता. राहता जि. अहमदनगर) येथे गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली अवैध मद्याची वाहतूक करतांना (एम एच. १८ बी. जी. ५२७४) या नंबरचा आयशर प्रो कंपनीचा १११४ मॉडल असलेला सहाचाकी टेम्पोची तपासणी करताना दारूबंदी गुन्हा अन्वेषण कामी गुन्हे नोंदवण्यात आला. यावेळी आरोपी गुड्डु देविसिग भिल (वय ३५ वर्ष रा. रामुखेडी खुडेल जि.इंदोर राज्य मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून गोवाराज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली रॉयल ब्लु व्हिस्कीच्या १८० मि.ली.च्या ५७,६०० बाटल्या (१२०० बॉक्सेस) ची किंमत ७४ लाख ८८ हजार व सहाचाकी वाहन आयशरची किंमत २० लाख मद्य वाहतूक करताना जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ९४ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यामध्ये अंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची शक्यता असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या अंतर्गत दुय्यम निरीक्षक एन. सी. परते करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर 
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश जी. पाटील यांचे सूचनेनुसार नगर प्र. उपअधीक्षक संजय सराफ, नगर निरीक्षक अनिल पाटील, बी.टी. घोरतळे, ए. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक एन.सी. परते, पी.बी. अहिरराव, डी. वाय. गोलेकर, के.यु.छत्रे, एम. डी. कोंडे, ए.सी.खाडे, व्ही.जी.सुर्यवंशी, व्ही.बी.जगताप तसेच भाऊसाहेब भोर, संजय साठे, मुकेश मुजमुले, एस. आर. वाघ, विकास कंटाळे, प्रवीण साळवे, नेहाल उके, के. के. शेख जवान नि वाहन चालक निहाल शेख, दीपक बर्डे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सहभागी होते.

Post a Comment

0 Comments