Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संचारबंदी उल्लंघन करणाऱ्या 90 हजार नागरिकांकडून दीड कोटी रुपये दंड वसूल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी शासनाने दिलेल्या आदेशानुसार संचारबंदी उल्लंघन, विनामास, सोशल डिस्टिंग पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मंगल कार्यालय 90 हजार 249 केसेस केसेस करून 1 कोटी 52 लाख 24 हजार 317 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भादवि कलम 188 प्रमाणे 26 हजार 856 गुन्हे दाखल झाले असून यामध्ये यामध्ये 31 हजार 148 आरोपी आहेत.

दि.15 एप्रिल 2021 पासून शासनाच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यामध्ये खडक निर्बंध घालण्यात आले. जिल्ह्यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन विनामास, सोशल डिस्टंसिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, आस्थापना यांच्यावर खालील प्रमाणे केसेस दंडात्मक कारवाई करण्यात आलेले आहे.
दि.15 एप्रिल- केसेस 633 (दंड 23 लाख 2500 हजार रुपये), दि.16 एप्रिल- केसेस 836 (दंड 35 लाख 2800 हजार रुपये), दि.17 एप्रिल- केसेस 972 (दंड 43 हजार), दि.18 केसेस -799 (दंड 36 लाख 1700 रुपये), दि.19 एप्रिल- केसेस 1 हजार 361 ( दंड 56 लाख 1 हजार 300 रुपये), दि.20 एप्रिल- 1 हजार 131 (दंड 4 लाख 34 हजार 700 रुपये), एकूण केसेस 5 हजार 732 (एकूण दंड 23 लाख 73 हजार)
दि. 15 एप्रिल 2021 पासून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 489 नागरिकांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 69 प्रमाणे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले व समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले. तसेच 253 वाहने पोलीस स्टेशनला अटकाव करून समज देऊन व कारवाई करून सोडले आहे. नागरिकांनी दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे. विनाकारण आवश्यकरित्या रस्त्यावर फिरू नये. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे. मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टंसिंग पाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अत्यावश्यक वस्तू (उदाहरणार्थ -किराणा, भाजीपाला इत्यादी) खरेदीच्या वेळेस अनावश्यक गर्दी करू नये, अशा ठिकाणी covid-19 च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावर पथके स्थापन केली आहेत. त्यांच्यामार्फत कारवाई करण्यात येत आहे. लोकांनी आवश्यक असेल तरच घर बाहेर पडावे, अत्यावश्यक बाहेर पडू नये घरीच थांबावे असे, आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments