Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अडीच कोटीचा बनावट चेक बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; 4 अटक, नगर एलसीबीची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: दिल्ली महापालिकेच्या नावाने असलेला अडीच कोटीचा बनावट चेक बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. 4 जणांना पोलिसांनी शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 
याप्रकरणी पोना रविकिरण सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
'दिल्ली मुन्सिपल कौन्सिल' या नावाने अडीच कोटी रुपयांचा एक चेक विपुल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर हे सावेडी येथील स्टेट बँक शाखेत आले. त्यांनी चेक वटविण्यासाठी दिला. बॅंक व्यवस्थापकास संशय आल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि मिथुन घुगे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.  
सपोनि घुगे व पोलीस कर्मचारी रवी सोनटक्के, संदीप पवार व इतर कर्मचारी यांनी बँकेत जाऊन खात्री केली. तेव्हा सदर चेक बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी विपुल नरेश वक्कानी (वय ४०), यशवंत दत्तात्रय देसाई (वय ४९), नरेश रामचंद्र बालकोंडेकर (वय ३३), राहुल ज्ञानोबा गुळवे (वय ४६), संदीप भगत, तुषार आत्माराम कुंभारे (सर्व रा. पुणे) व विजेंद्र दक्ष (रा. दिल्ली) या 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील विपुल नरेश वक्कानी, यशवंत दत्तात्रय देसाई, नरेश रामचंद्र बालकोंडेकर, राहुल ज्ञानोबा गुळवे यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. याच्याकडून २० लाख ९५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल दोन कार, बनावट शिक्के, चेकबुक, मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि मिथुन घुगे, सफौ नानेकर, पोना रविकिरण सोनटक्के, संदीप पवार, दिनेश मोरे, शंकर चौधरी, पोकाॅ कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments