Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नाशिकला 7 टॅंकर ऑक्सीजनचे पोहचले ; एका दिवसात 74 हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले बरे

 

केंद्राने मान्य केली टँकर 
विमानाने घेऊन जाण्याची मागणी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई- महामारीमध्ये दोन दिलासादायक घटनासमोर आल्या असून, प्रथम एका दिवसात 74 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एका दिवसात बरे होणाऱ्यांचा सर्वात मोठा आकडा आहे. दुसरीकडे 20 एप्रिलला विशाखापट्टनमला गेलेली देशातील पहिली स्पेशल ट्रेन ऑक्सिजन घेऊन नागपुरातून शनिवारी सकाळी नाशिक मध्ये आली आहे.
ट्रेनच्या माध्यमातून 7 लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ( एलएमओ) टँकरमधील तीन हे नागपूर आणि चार हे नाशकात उतरवण्यात आले. हे रस्ते मार्गाने राज्यात वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यात सहाव्यांदा संक्रमित रुग्णांची संख्या 60 हजारांच्यावर गेली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑक्सीजनचे रिकामे टँकर इंडियन एअरफोर्सच्या विमानांनी दुसऱ्या राज्यांच्या ऑक्सिजन प्लांट्सपर्यंत पोहोचवण्यासाठी परवानगी मागितली होती. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती दिली आहे. टोपे यांनी सांगितले की, दुसऱ्या राज्यांमध्ये ऑक्सिजनचे रिकामे टँकर विमानाने पाठवले जातील. ऑक्सिजन भरल्यानंतर टँकर ट्रेन किंवा रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येतील.
दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी घ्यावे लागेल ई-पास
महाराष्ट्रा बाहेर किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी आता यात्रा पार घेणे आवश्यक असेल. महाराष्ट्र पोलिसांनी पहिले लॉकडाऊनचा नियम पुन्हा एकदा लागू केला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले की, राज्यात शुक्रवारपासून ई-पास सिस्टम लागू करण्यात आली आहे. पाससाठी लोकांना https://covid19.mhpolice.in वर अर्ज करावा लागेल. जे लोक ऑनलाइन अर्ज करु शकत नाही, ते जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मदत घेऊ शकतात. ई-पास आपत्कालिन स्थितीत वयक्तित वापरासाठी जारी केले जातील.
टेली-मेडिसिन आणि टेली-ICU
 सेवेवर जोर : मुख्यमंत्री 
दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी म्हटले होते की, कोरोना रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करण्यासाठी टेली-मेडिसिन आणि टेली-ICU सेवेवर जोर दिला जात आहे. त्यांनी म्हटले की, कोरोना विना लक्षण आणि सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्यावर त्यांच्यावर उपचार केले जात आहे. या कामात सेवानिवृत्त डॉक्टर आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे.
Post a Comment

0 Comments