Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

देशात 'पंतप्रधान केअर्स फंडा' तून सरकारी रुग्णालयात 551 ऑक्सीजन प्लांट

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली - देशामध्ये वाढत्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, ऑक्सीजनची मागणी वाढली आहे. यामुळे नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशातील सरकारी रुग्णालयांत 551 ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत आहे. हे ऑक्सीजन प्लांट लावण्यासाठी 'पंतप्रधान केअर्स फंड"तून निधी वापरण्यात येत आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या सूञांनी सांगितले.
रुग्णालयातील ऑक्सीजन वाढवण्यासाठी 'पंतप्रधान केअर्स फंड'ने सार्वजनिक आरोग्य सुविधेत 551 डेडिकेटेड प्रेशर स्विंग अँड्सॉर्प्शन मेडिकल ऑक्सीजन जेनरेशन प्लांट लावण्यासाठी फंडला मंजुरी मिळाली आहे.
याबाबत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ऑक्सीजनची वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर तातडीने आढावा बैठक घेतली होती. यात त्यांनी मेडिकल ग्रेड ऑक्सीजनची क्षमता वाढवण्यासोबतच घर आणि रुग्णालयातील रुग्णांसाठी लागणाऱ्या महत्वाच्या वस्तुंची पुर्तता करण्यावर जोर दिला होता. त्यांनी सर्व मंत्रालय आणि विभागांना ऑक्सीजन आणि मेडिकल सप्लायच्या उपलब्धतेसाठी कामात ताळमेळ ठेवण्यास सांगितले होते. हा निर्णयदेखील घेण्यात आला होता की, 3 महीन्यांसाठी ऑक्सीजनशी संबंधित वस्तु आणि उपकरणांच्या आयातीवर बेसिक कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस लावला जाणार नाही. याबाबत मोदींनी महसूल विभागाला अशा उपकरणांच्या इंपोर्टवर लवकरात लवकर कस्टम क्लीयरेंस देण्याचे निर्देश दिले होते. हा निर्णयदेखील घेण्यात आला होता की, कोरोनाच्या लसींच्या आयातीवरील बेसिक कस्टम ड्यूटीला 3 महिन्यांसाठी बंद करण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments