Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

50 हजारांची लाच घेताना सहाय्यक निबंधक एसबीच्या जाळ्यात ; नगर एसबीची कारवाई



ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- येथील सहकारी संस्था अहमदनगर वर्ग-2 सहाय्यक निबंधक हे तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी ( दि.15) कायनेटिक चौकात एका हाॅटेलमध्ये रंगेहाथ पकडले.  अहमदनगर एसबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सुदाम लक्ष्मण रोकडे असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी एका पतसंस्थेकडुन 2014 मध्ये सोने तारण ठेऊन 30,000,00/-₹ कर्ज घेतले होते. संबधित प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता . तक्रारदार यांनी न्यायालयाचे आदेशानुसार पतसंस्थेचे कर्जाची सर्व रक्कम भरली असतानाही पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर यांचे कडे कलम 101 नुसार तक्रारदार यांचे कडुन वसुली ची कारवाई करणेचे आदेश मिळणेकरिता प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला होता. तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला म्हणून त्याचे मोबदल्यात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे आज रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान ₹ 1,00,000/- ची मागणी करून तडजोड अंती 50,000 रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष करुन आज रोजी कायनेटिक चौक येथील होटेल जस्ट ईन अव्हेन्यु मध्ये आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम 50,000 रुपये स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
नाशिकचे एसबीचे अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक सोनवणे व वाचक पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

Post a Comment

0 Comments