Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यांना 400 रुपयांना मिळेल लस ; सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून कोवीशील्डची किमती कमी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली - भारत बायोटेकने कोरोनाविरोधात वापरली जाणारी कोव्हॅक्सिनची किंमत कमी करण्यात आली आहे. लस ही राज्यांना 600 ऐवजी 400 रुपयांना दिली जाईल. कंपनीने गुरुवारी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. बुधवारी म्हणजेच काल सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने कोवीशील्डची किंमत कमी केली आहे.


देशात लसीच्या वेगवेगळ्या किमतीवरुन वाद सुरू होता. कोवीशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनची किंमत खूप जास्त ठेवली होती. कोव्हॅक्सिनने केंद्र सरकारसाठी व्हॅक्सीनची किंमत 150, राज्यांसाठी 600 आणि खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये ठेवली होती. आता राज्यांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने तयार केलेली भारतीय लस कोव्हॅक्सिन जगातील यशस्वी लसींपैकी एक आहे. कंपनीने फेज-3 क्लीनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या परिणांच्या आधारे दावा केला आहे की, ही लस 78% परिणामकारक आहे. म्हणजेच, कोरोना संसर्ग रोखण्यात 78% इफेक्टिव आहे.

Post a Comment

0 Comments