Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारात मेडिकलमध्ये रेमडीसेवीर इंजेक्शन काळबाजाराने विक्री ; 4 जणांवर गुन्हे दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- भिंगार येथील मेडिकलमध्ये काळबाजाराने रेमडीसेवीर इंजेक्शन काळबाजाराने विक्री केल्याने दोन डाॅक्टरासह 4 जणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद दत्तात्रय आलाट (वय 27, फार्मसिस्ट रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर), रोहित अर्जुन पवार ( वय 22 रा. साकत ता.जि अहमदनगर) आंणि डॉ. कौशल्या किशोर मस्के, डॉ. किशोर दत्तात्रय मस्के आदिंवर गुन्हा दाखल आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, भिंगार अर्बन बँकेसमोर भिंगार येथे प्रसाद दत्तात्रय आलाट (वय 27, फार्मसिस्ट रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर), रोहित अर्जुन पवार ( वय 22 रा. साकत ता.जि अहमदनगर) याच्या मदतीने व मस्के हॉस्पिटलमधील डॉ. कौशल्या किशोर मस्के व डॉ. किशोर दत्तात्रय मस्के यांच्याशी संगनमत करून सध्या सुरू असलेल्या covid-19 यासाठीच्या आजाराचे औषध चैतन्य मेडिकल स्टोअर्स मस्के हॉस्पिटल (भिंगार) या ठिकाणावरून बेकायदेशीररित्या मिळवून स्वतःचे व डॉक्टरांचे आर्थिक फायदा करिता बिलाने विना प्रिस्क्रिप्शन विना कोविड तपासणी अहवाल 4 हजार 800 रुपये या कमाल किमतीचे रेमडीसेवीर इंजेक्शन 100 एमजी आब्लिक वायल डेसरेम मायलोन या कंपनीचे हे चढ्या भावाने काळ्याबाजारात 12 हजार रुपये किमतीला विक्री करताना सापडले. यावेळी 15 रेमडिसेवीर इंजेक्शन 100 एमजी अब्लिक वायल किंमत 72 हजार 600 रुपये, 10 हजार रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाइल प्रसाद अल्हाट याचे तब्येतील, 20 हजार रुपये किमतीची एक हिरो स्प्लेंडर प्लस ( क्र. एम एच 16 सीके 3272) व प्रसाद अल्हाट याचे ताब्यातील एकूण रुपये 1 लाख 2 हजार 600 मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अन्न व औषध प्रशासन अहमदनगरचे औषध निरीक्षक जावेद हुसेन शेख यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाणे 137/2021 भादवि कलम 420,34 सह परिच्छेद 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 चे 6 कलम (3)(2)(c) जीवनावश्यक वस्तूची अधिनियम 1955 चे उल्लंघन दंडनीय कलम 7(1)(a) (2)तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 (c) चे उल्लंघन दंडनीय कलम 27(B)(2) अन्वये प्रसाद दत्तात्रेय अल्हाट, रोहित अर्जुन पवार, डॉ कौशल्या किशोर म्हस्के, डॉ किशोर दत्तात्रय म्हस्के (दोघे रा. वडारवाडी भिंगार) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments