Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीसह दरोडा घालणारे 3 आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - मोक्काच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीसह स्वस्तात गोडतेलाचे डबे देण्याचं अमिष दाखवून दरोडा घालणारे तीन आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे.
कारवाई १४/०४/२०२१ रोजी फिर्यादी हर्षल शिवशंकर चौधरी , वय- ३१ वर्षे , रा . अकलूज , ता . माळशिरस , जि . सोलापूर यांना आरोपी जाधव (रा. खडकी, ता. नगर) याने व त्याचे साथीदारांनी स्वस्तात गोडतेलाचे डबे देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांना घोसपूरी ( ता. नगर) शिवारातील निर्जन स्थळी बोलावून घेवून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांचे जवळील रोख रक्कम , मोबाईल , मनगटी घड्याळ असा एकूण ७६ हजार रु . किं . चा ऐवज दरोडा टाकून बळजबरीने चोरुन नेला होता . सदर बाबत फिर्यादी यांनी नगर तालुका पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं . ११८४/२०२१ , भादवि कलम ३९५ प्रमाणे दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा घडल्यानंतर मा . पोलीस अधीक्षक सो , अहमदनगर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून सदर गुन्ह्यातील आरोपीतांचा स्वतंत्र पथक नेमून शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि अनिल कटके यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे श्री. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तसेच नगर तालुका पो.स्टे . चे सपोनि राजेन्द्र सानप , पोसई जारवाल , पोहेकॉ आबनावे यांनी सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेतली. आरोपींचा शोध घेत असताना पोनि अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा राहूल भोसले ( रा . वाळकी, ता. नगर) याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वाळकी येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती काढून सापळा लावला. आरोपीस पोलीस पथक आल्याची चाहूल लागल्याने तो पळून जावू लागला असता, सपोनि मिथुन घुगे, उपनि गणेश इंगळे, पोहेकॉ संदीप पवार, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, पोकॉ प्रकाश वाघ , आकाश काळे यांनी त्याच्यावर झडप घातली इतर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी पाठलाग करुन मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव पत्ता राहूल नेवाशा भोसले , (वय २२ , रा . वाळकी, ता. नगर) असे असल्याचे सांगितले. त्याला विश्वसात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली.यावेळी असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार दगू भोसले (रा.पढेगांव, ता . कोपरगांव) व उरुस चव्हाण ( रा. वाळकी, ता. नगर) अशांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यावरुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी साथीदार आरोपींचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून आरोपी दगू बडोद भोसले (वय२७, रा . पढेगांव , ता . कोपरगांव), उरुस ज्ञानदेव चव्हाण ( वय ३३ रा. वाळकी, ता. नगर) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले . त्यानंतर आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता आरोपींनी चोरलेल्या मुद्देमालापैकी १० हजार रु. किं. चा आयफोन अॅपल मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला ५ हजार रु . किं. चा ओपो कंपनीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रु. किं. ची होंडा कंपनीची स्मार्ट मॉडेलची मो. सा . (नं . एमएच १६, सीएन -७०६७) असा एकूण ६५ हजार रु. किं .चा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहे. 
आरोपी दगू बडोद भोसले हा कोपरगांव तालूका पो.स्टे . गुरनं . १ १०४ / २०१ ९ , भादवि कलम ३ ९ ५ , ४२० , १२० ( ब ) , ४१२ सह मोक्का कायदा १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( २ ) , ३ ( २ ) ( ३ ) ( ४ ) या मोक्काचे गुन्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून फरार असून फरार कालावधीमध्ये सदर आरोपीने वरील नमुद गुन्हा केलेला आहे . वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . आरोपी राहूल नेवाशा भोसले याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . 1 २३४/२०१७ , भादवि कलम ३ ९ ५ , ३ ९ ७ प्रमाणे २ ) नगर तालुका पो.स्टे . गुरनं . T१२३ / २०१७ , भादवि कलम ३ ९ ५ , ४२० प्रमाणे ३ ) नगर तालूका पो.स्टे . गुरनं . ११५५/२०१४ , भादवि कलम ३ ९९ प्रमाणे आरोपी दगू बडोद भोसले याचे विरुध्द दाखल गुन्हे १ ) कोपरगांव तालुका पो.स्टे . गुरनं . ११०४ / २०१ ९ , भादवि कलम ३ ९ ५ , ४२० , १२० ( ब ) , ४१२ सह मोक्का कायदा १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( २ ) , ३ ( २ ) ( ३ ) ( ४ ) प्रमाणे ( फरार ) २ ) कोपरगाव पो.स्टे . गुरनं . । १३/२०१६ , भादवि कलम ३ ९ ५ , ४२० प्रमाणे ३ ) कोपरगाव पो.स्टे . गुरनं . 1८ ९ / २०१५ , भादवि कलम ३ ९ ४ , ३४ प्रमाणे ४ ) कोपरगाव पो.स्टे . गुरनं . ९ ० / २०१७ , भादवि कलम ३२६ प्रमाणे ५ ) संगमनेर तालुका पो.स्टे . गुरनं . 1५ ९ / २०१५ , भादवि कलम ३ ९ ५ प्रमाणे ६ ) संगमनेर तालुका पो.स्टे . गुरनं . 1५ ९ / २०१७ , भादवि कलम ३ ९ ५ प्रमाणे ३ ) उरुस ज्ञानदेव चव्हाण , वय -३३ वर्षे , रा . वाळकी , ता . नगर १ ) नगर तालूका पो.स्टे . गुरनं . २०८/२०१३ , भादवि कलम ३ ९ ५ , ४२० प्रमाणे २ ) नगर तालूका पो.स्टे . गुरनं . 1५५/२०११ , भादवि कलम ३ ९ ५ , ४२० प्रमाणे ३ ) नगर तालूका पो.स्टे . गुरनं . २५५/२०१७ , भादवि कलम ३ ९ ५ , ४२० प्रमाणे ४ ) निफाड पो.स्टे . गुरनं . 1३७/२००६ , भादवि कलम ३ ९ ५ , ४२० प्रमाणे आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पो.स्टे . येथे हजर करण्यात आलेले आहे. 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप, सपोनि मिथुन घुगे, उपनि गणेश इंगळे, पोहेकॉ संदीप पवार, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, पोकॉ प्रकाश वाघ , आकाश काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments