Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

​​​​​​​पर्यावरणात 300 वर्षांच्या तुलनेत कॉर्बन डायऑक्साइडची 50 % ने वाढ ; 2021 राहणार सर्वात उष्णतेचं वर्ष


 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पृथ्वीवर गेल्या काही वर्षांपासून उष्णतेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, पर्यावरणात कॉर्बन डायऑक्साइड (सीओ2) गॅसच्या उत्सर्जनातदेखील वाढ होत आहे. काही तज्ञांच्या मते, 2021 हे वर्ष सर्वात जास्त तापणार असून आतापर्यंतचे सर्वात जास्त उष्णतेचं वर्ष राहणार आहे. एका अवहालानुसार, यावर्षी कॉर्बन डायऑक्साइडचे प्रमाण गेल्या 300 वर्षाच्या तुलनेत 50 टक्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कॉर्बन डायऑक्साइडचे 25 टक्के प्रमाण फक्त गेल्या 30 वर्षात वाढले आहे. हे खूपच भवायह असून मानव जातीसाठी धोकादायक असल्याची चिंता काही तज्ञांनी केली आहे.
अलिकडेच अमेरिका आणि ब्रिटनमधील काही संशोधनकर्त्यांनी हवाई परिवहन आणि बर्फाळ प्रदेशाचा अभ्यास केला. त्यांच्या मते, इ.स.1750-1800 या काळात कार्बन डायऑक्साइडचे सरासरी प्रमाण 278 (PPM) होते तर दुसरीकडे 2021 वर्षाचा विचार केल्यास याचे प्रमाण 417.14 PPM पोहचले आहे. काही तज्ञांच्या मते, 2021 हे वर्ष जगातील सर्वात जास्त उष्णतेचं वर्ष राहणार असून यामध्‍ये कॉर्बन डायऑक्साइडचे प्रमाण 419.5 PPM राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.


Post a Comment

0 Comments