Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रिंटींग मटेरिअलचे रेट 30 ते 40 टक्क्यांनी वाढले; व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ
नगर : राज्यासह देशभरात कोरोना संकटाचे सावट कायम आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.  अनेक छोटे मोठे व्यवसाय  अडचणीत आले आहेत. काही व्यवसाय तर अगदी बंदच पडले आहेत. महागाईचे हे ग्रहण प्रिंटिंग व्यवसायालाही लागले आहे. शाई व इतर  केमीकल्स १५  ते २० टक्के, कागद  २५ ते ३५ टक्के तर लॅमिनेश फिल्मचे रेट ४० ते ५० टक्के वाढले आहेत. मटेरियलचे रेट वाढल्यामुळे पूर्वी घेतलेली कामे सुध्दा पुर्ण करुन देणे मुश्किल होऊन बसले आहे. कारण मागील वर्षीचे रेट आणि आताचे रेट यात खुप तफावत पडली आहे. 'धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय' अशी प्रिंटींग व्यवसायिकांची गत झाली आहे. काम घ्यावे तर परवडत नाही अन् नाही घ्यावे तर काय करावे, अशा धर्मसंकटात व्यवसायीक काम करत आहेत.
गाळाभाडे, कामगारांचे पगार, वीजबिल, आदी खर्च हा महिन्याचा कायमचा आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रिंटींग मशिनचे चाक बंद पडल्यागत झाले आहे.
डिजीटलायझेशन व ग्लोबलायझेशनच्या या जमान्यात कोरोना काळापासून ऑनलाईन वर्कींग सुरु झाल्याने स्टेशनरीचे हक्काचे कामही नाही. त्यामुळे लहान मोठे सर्वच प्रिंटींग व्यवसायीक अडचणीचा सामना करत आहेत.
मार्च, एप्रिल, मे ही तीन महिने प्रिंटींग व्यवसायीकांचा लग्नपत्रिका छपाईचा  कालावधी असतो. या काळातील कामाच्या जोरावर वर्षभर थोडेफार काम चालले तरी व्यवसायात गुजरान होते मात्र गतवर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे ऐन सिझनमध्येच लॉकडाऊन पडल्याने मागील वर्षीचा सिझन गेला आणि यावर्षीचाही सिझन हातुन गेला आहे.
यावर्षी शाळा न उघडल्यामुळे अनेंक मोठ्या प्रिंटींग व्यवसायीकांचे मोठाल्या मशिन अक्षरश:बंद आहेत व कामगारांना बसुन पगार देण्याची वेळ आली आहे.
वाढदिवस, मुंज, निमंत्रण पत्रिका, वाढदिवस फ्लेक्स, ग्रिटींग कार्ड ही सर्व प्रिंटींग स्वरुपात लोकांपर्यत पोहोचण्यासाठी छापले जात. आता मात्र सोशल मिडीयाच्या वापरामुळे ते काम फक्त डिझाईन पुरतेच मर्यादीत झाले आहे.
              प्रिंटींग मटेरियलचे रेट वाढल्याने प्रिंटींग व्यवसायीकांनीही स्टेशनरीचे रेट वाढवले. ग्राहकांडून मात्र पूर्वीच्या भावात काम करून घ्या, असा आग्रह धरला जात आहे. ते शक्य नाही. हे समजावून सांगतांना नाकी नव येतात. तसेच वेळही खूप जातो असे मुद्रन व्यावसायिक सांगतात. 

*चौकट*
ग्राहकांनी समजून घ्यावे...

सोन्याचे भाव वाढले म्हणून काय ग्राहक मागील रेटमध्ये सोने मागत नाही किंवा यात पैसे कमी करा असेही म्हणत नाही त्या प्रमाणे प्रिंटींग मटेरियलचे रेट वाढले म्हणून ग्राहकांनी प्रिंटींग व्यवसायीकांना समजून घेऊन सहकार्य करणे गरजेचे आहे.
- मुकुंद दळवी 
(अध्यक्ष, दि.अहमदनगर प्रेस अलाईड ॲण्ड ओनर्स असोसीएशन)

मोठ्या व्यवसायिकांची अस्तित्वाची लढाई...

टाळेबंदीमुळे कच्चा माल, सेवा, वाहतूक इत्यादिंच्या किंमती वाढलेल्या असतानांच मुद्रण दरात मात्र कपात होत आहे. त्यामुळे छपाईतून मिळणार्‍या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. या व्यतिरिक्त शासनाकडून व कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या छपाईसाठी निवीदा काढण्यात येतात. निविदा प्रक्रियेत छोटे व्यवसायीक टिकत नसल्याने मोठ्या व्यवसायीकांचीही अस्तित्वासाठीच लढाई सुरु आहे. मुद्रक व्यवसाईकांसह कामगारांच्याही रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून सरकारने लक्ष घालुन अडचणीत आलेल्या मुद्रण व्यवसायीकांना मदत करणे अपेक्षित आहे.
- मनोज बनकर (मा.अध्यक्ष, दि.अहमदनगर प्रेस अलाईड ॲण्ड ओनर्स असोसीएशन)

डिजीटल प्रणालीचा फटका...

बँकांतील कॅशलेस व इंटरनेट वापरामुळे मुद्रण उद्योगातील नोकर्‍या आधिच कमी झाल्या आहेत. इंटरनेटच्या जगात सध्या डिजीटल कागदपत्रांसह पीडीएफ पुस्कांची मागणी वाढत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात छापण्यात येणार्‍या पुस्तकांचे काम कमी झाले परिणामी डिजीटल प्रणालीचा फटका मुद्रक बांधवांना बसत आहे.
- नंदेश शिंदे
(मुद्रण व्यवसायीक)

Quick reply to <shidhu.mete@gmail.com>

Post a Comment

0 Comments