Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात 23 हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण ; 10 टक्के रूग्णांना 'रेमडेसिवीर इंजेक्शन' आवश्यक - अन्न औषध प्रशासन अधिकारी श्री कातकडेऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर - जिल्ह्यात 23 हजाराच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत. दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार 10 टक्के लोकांना कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता लागू शकते, शासकीय व खाजगी रुग्णालयातील अशा दोन्ही रूग्णालयातील कोरोना रुग्णांना डॉक्टरांकडून जास्तीत जास्त इंजेक्शन लिहून दिले जातात. यामुळे 5 ते 6 हजार इंजेक्शनची गरज अहमदनगर जिल्ह्यात दररोज भागवली जात आहे. त्या प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यात इंजेक्शनचा पुरवठा कमी होत असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन अधिकारी श्री. कातकडे यांनी दिली.

रेमडेसिवीर इंजेक्शन साठा दि. 15 एप्रिलला उपलब्ध झाला नाही. दि. 16 एप्रिलला 144 इंजेक्शन उपलब्ध झाले. दि.17 एप्रिलला 808 इंजेक्शन प्राप्त झाले, तर दि. 18 व 19 तारखेला इंजेक्शनचा साठा आला नाही. दि. 20 ला 1 हजार 360 रेमडेसिवीर इंजेक्शन साठा उपलब्ध झाला. हा उपलब्ध इंजेक्शन साठ्याचे वितरण जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सर्व रुग्णालयांना यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये रुग्णालयांनी रुग्णांची माहिती दररोज देण्यात आलेल्या मेलवर रुग्णांची माहिती नोंदवावी. त्यात रुग्णांचे तापमान किती आहे ?, सिटीस्कॅन स्कोर किती आहे ? यासह रुग्णांची परिस्थितीचा आढावा द्यावा आणि किती रुग्णांना इंजेक्शनची गरज आहे. याबाबत मेलमध्ये संबंधित रुग्णांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. मेलवर संकलित सर्व माहितीची छाननी केली जाते. यानंतर ऑक्सिजन बेड रुग्णांच्या प्रमाणात उपलब्ध साठ्याचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय नियुक्त समिती करते. अहमदनगर जिल्ह्यात पाच कंपन्यामार्फत कोरोना संबंधित औषधे उपलब्ध होत आहेत. प्रामुख्याने जिल्ह्यात 'हेड्र' या औषध कंपनीतर्फे पुरवठा होतो. परंतु हा पुरवठा डायरेक कोव्हीड सेंटर व मेडिकल स्टोअर्स यांना होतो. उर्वरित बाकीच्या कंपन्या या नगर जिल्ह्यातील वितरकामार्फत साठा मिळतो. परंतु त्या साठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होलसेलरकडून माहिती मागवली जाते. मागणीनुसार कोव्हिड रुग्णांची संख्या, गंभीर रुग्णाची संख्या याबाबत विचारणा करून, त्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे प्रमाण ठरवले जाते. ती संबंधित यादी होलसेलर कडे जाते. त्या संबंधित रुग्णालयांना तो रेमडेसिवीर इंजेक्शन साठा उपलब्ध करून देतात. एकूण 40 ते 45 रुग्णालय व मेडिकल स्टोअर्स यांना कंपनीमार्फत इंजेक्शनचा पुरवठा होतो. जवळपास 20 औषध एजन्सीमार्फत ही इंजेक्शन उपलब्ध आहेत, असे श्री कातकडे म्हणाले.

Post a Comment

0 Comments