Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन'अंतर्गत निर्बंध आणखी कडक ; 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन'अंतर्गत निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत.
या नुसार, अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. पण, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येतील. तर, सर्व सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. तसेच, लग्नात 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळ मर्यादा दिलेली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे.
या नियमांमध्ये जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला असून, खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तर, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय.

Post a Comment

0 Comments