Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मे 2021 ला नियमितपणे मिळणारे अन्नधान्य मोफत मिळणार : जिल्हा पुरवठा अधिकारी माळी

 

रास्त भाव रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य मिळणार आहे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना (PHH) मे, 2021 करीताचे धान्य मोफत उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना कुटुंबांना प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. तांदूळ 3 रु. प्रतिकिलो , गहू 2 रु. प्रतिकिलो या दराने सदर अन्नधान्य वितरित केले जाते. तथापि, राज्यात कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने सदर अन्नधान्य मे, 2021 मध्ये मोफत वितरित करण्यात येईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मे 2021 ला नियमितपणे मिळणारे अन्नधान्य मोफत मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

केंद्र शासनानेदेखील मे व जून 2021 साठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मे व जून 2021 करीता नियोजित नमूद केलेल्या नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य 5 किलो अन्नधान्य मोफत मिळणार आहे. यामुळे राज्यातील AAY व PHH शिधापत्रिकाधारकांना मे, 2021 मध्ये 2 वेळा मोफत अन्नधान्य मिळणार आहे.
🔴रास्तभाव दुकानातून अन्नधान्य स्वीकारताना शिधापत्रिकाधारकाने घ्यावयाची काळजी-
👉दुकानात जाण्यापूर्वी आपल्या शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याचा तपशील तपासून घ्यावा. सदर तपशील खालील लिंकवर तपासून पाहता येईल-
http://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp 
या लिंकवर क्लिक केल्यावर महिना, वर्ष व आपला 12 अंकी शिधापत्रिका क्रमांक (SRC no.) नमूद करून आपल्या शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय अन्नधान्याची माहिती मिळवता येईल.
शिधापत्रिकेचा 12 अंकी क्रमांक माहीत नसल्यास खालील व्हिडिओ पाहावा.
https://youtu.be/v1y1qJc_XnM
👉रास्तभाव दुकानातून अन्नधान्य स्वीकारल्यानंतर दुकानदाराकडून पावती मागून घ्यावी.* सध्या ePOS मशिनद्वारे अन्नधान्याचे वितरण होते. त्यामुळे लाभार्थ्यांचे Adhar based Biometric Authentication झाल्यानंतर मशीनमधून एक पावती (दुकानातून ATM कार्ड द्वारे खरेदी केल्यावर ज्याप्रमाणे पावती प्राप्त होते त्याप्रमाणे) प्राप्त होते. *सदर पावती देणे दुकानदारावर बंधनकारक आहे.* पावतीवरील अन्नधान्य वितरणाचा तपशील व आपल्याला वितरित करण्यात आलेले अन्नधान्य योग्य आहे किंवा नाही हे तपासून पाहावे.
👉 दुकानदार पावती देण्यास टाळाटाळ करीत असल्यास किंवा शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याएवढ्या अन्नधान्याचे वितरण करीत नसल्यास पुरवठा विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा पोर्टल वर रीतसर तक्रार नोंदवावी. 
नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक: १८००-२२-४९५० व १९६७
ऑनलाइन तक्रारीसाठी पोर्टल
http://mahafood.gov.in/pggrams/
👉सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वन नेशन-वन रेशन कार्ड ही योजना राबविण्यात येत असल्याने आपली शिधापत्रिका कोणत्याही जिल्ह्यातील असली तरीही, आपण सध्या राहत असलेल्या ठिकाणी/ नजीकच्या रास्तभाव दुकानातून आपल्या अन्नधान्याचा लाभ घेऊ शकतो. त्याकरिता आपल्या शिधापत्रिकेचा 12 अंकी क्रमांक किंवा आपला आधार क्रमांक जवळ असावा.
(वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन नं. १४४४५)

Post a Comment

0 Comments