Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात शिवभोजन केंद्रावर गरीब- गरजूंना मोफत जेवण मिळणार ; 19 ठिकाणी 3,150 मोफत थाळी देण्यास मंजुरी : जयश्री माळी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - 'ब्रेक द चेन' ची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे. या कालावधीत गरीब-गरजू लोकांना जेवणाअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत, यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात तीन तालुक्यात सर्व 19 ठिकाणी यामध्ये काही हॉटेल्स, भोजनालय यासह अन्य ठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था करून दिली आहे. जिल्ह्यात मोफत जेवण देणाऱ्या एकूण 19 ठिकाणी 3 हजार 150 मोफत थाळी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.

अहमदनगर शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोफत जेवणाची सुविधा असणारी हॉटेल्स, भोजनालय याप्रमाणे आहेत - अहमदनगर - श्री दत्त हॉटेल (रेल्वे स्टेशन अहमदनगर), कष्टाची भाकरी केंद्र (हमाल पंचायत), हॉटेल सुवर्णम (तारकपूर बसस्थानक समोर), कृष्णा भोजनालय, हॉटेल अंबिका पॅलेस (मार्केटयार्ड) शिव भोजनालय (रेव्हेन्यू कॅन्टीन जिल्हाधिकारी कार्यालय), तिवारी भोजनालय (टिव्ही सेंटर तहसील कार्यालय समोर), स्वामी समर्थ स्नॅक बार (बसस्थानक क्र.3 स्वास्तिक चौक), बळीराजा भोजनालय (चौपाटी कारंजा दिल्लीगेट), संस्कृती हॉटेल ( कोंड्यामामा चौक), नगर तालुका - हॉटेल अंबिका (एमआयडीसी, नागापूर) नेवासा - हॉटेल सद्गुरू कृपा (गणपती चौक नेवासा बुद्रुक), श्रीगोंदा - हर्षवर्धन केटरिंग (रविवार पेठ श्रीगोंदा), पारनेर - हॉटेल दुडलँड (शिवाजीरोड पारनेर), पाथर्डी - नेताजी सुभाषचंद्रबोस प्रतिष्ठान (नवीन स्टँड समोर पाथर्डी), हॉटेल रोहित (जुने बसस्थानक समोर पाथर्डी), शेवगाव - बळीराजा भोजनालय (कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव), सक्षम स्वयंसहाय्यता महिला बचतगट (पंचायत समिती शेवगाव), संगमनेर - हॉटेल शबरी (मोमीनपुरा संगमनेर), अकोले - हॉटेल सम्राट (बस्थानक अकोले), श्रीरामपूर - मामा वडापाव सेंटर (एसबीआय जवळ जिजामाता चौक), विलास टी हाऊस (संत लूक हॉस्पिटल समोर), राहुरी - तृप्ती भोजनालय (बसस्थानकसमोर राहुरी), कर्जत - हॉटेल शिवनेरी (बसस्थानकजवळ कर्जत), जामखेड - दशराज खानवळ (नगर रोड जामखेड), राहाता - हॉटेल जय मल्हार (विरभद्र मंदिर परिसर राहाता), हाॅटेल कृष्णाई (एसटी स्टँड समोर राहाता), कोपरगाव - अष्टविनायक स्वयंसहायता महिला बचतगट मुर्शतपुर, श्री प्रतिमा महिला स्वयंसहाय्यता बचत गट कोपरगाव.

"👉शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरण नियमाचे पालन करून भोजन केंद्रातून दुपारी 11 ते 4 या कालावधीत पार्सल सुविधा शिवभजन उपलब्ध.
👉वेळेत कोणताही लाभार्थी शिव भोजनात शिव भोजना विना परत जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
👉कोणत्याही सबळ कारणाशिवाय भोजन केंद्र बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी "

Post a Comment

0 Comments