Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पञकार दातीर यांचा 18 एकरच्या भूखंडाच्या कारणातून खून, सहभागी आरोपींना कडक शासन व्हावे : माजीमंञी शिवाजी कर्डिले

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- राहुरी येथील 18 एकराच्या भूखंडाच्या कारणातून पत्रकार रोहिदास दातीर यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सहभागी असणा-या सर्व आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना कडक शासन हवे, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
दि.6 एप्रिल रोजी राहुरी येथील मल्हारवाडी रोड वरून दिवसाढवळ्या पञकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांचा अमानुषपणे खून करण्यात येऊन त्यांच्या मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात आणून टाकण्यात आला. मयत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते. याबाबत दातीर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आपल्या जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मयत पत्रकार दातीर यांनी केली होती. राहुरी तालुक्याच्या इतिहासात बिहार राज्याला लाजवेल अशी घटना येथे घडली आहे. गुंडप्रवृत्तीच्या गुन्हेगारांची सामान्य नागरिकांत मोठी दहशत निर्माण झाले आहे. पोलिसांचा कायद्याचा धाक राहिलेला दिसत नाही. मयत दातीर यांनी राहुरी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या 18 एकर क्षेत्राच्या खरेदी विक्री व ताब्याबाबत वेळोवेळी उपोषण तक्रार अर्ज बातम्या आदींच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी कान्हू गंगाराम मोरे या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मोठे राजकीय पाठबळ असल्याची शक्यता आहे. यापूर्वी संशयित आरोपी कान्हू मोरे त्याच्यावर 302 सारखे गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. घटना घडण्यापूर्वी काही दिवस आरोपी कोणाच्या संपर्कात होते. संबंधित खुनाचा कट कसा शिजला याबाबत संशयित आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर तपासावेत. मोबाईल लोकेशन तपासावे. अपहरण झाले त्यावेळी घडलेल्या प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत. या प्रकरणी मयत दातीर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेल्या आहेत. त्याबाबत चौकशी व्हावी व वादग्रस्त 18 एकर क्षेत्रावरील मालकी हक्क असणाऱ्या संबंधित व्यक्तीने संघटित होऊन रोहिदास दातीर यांचा खून केला आहे. त्या संबंधितांना आरोपी करण्यात यावे. याबाबत महत्त्वाचे पुरावे व कागदपत्र उपलब्ध असून तपास कामी मागणी केल्यास सादर करण्यात येतील. या गुन्ह्यातील सहभागी असलेल्या सहभागी असलेल्या सर्वांच्या मुळाशी जाऊन तपास करावा सर्वाच्या मुळाशी जाऊन सर्व आरोपींना अटक करावी व त्यांना कठोर शासन व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे. 
निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे शरद बाचकर, नानासाहेब अंधारे, सचिन गुलदगड, संजय तमनर, बबन कोळसे, सर्जेराव घाडगे, अविनाश बाचकर, प्रभाकर हरिश्चंद्र, शरद उदावंत, नारायण घोंगडे, सुभाष गायकवाड आदिसह अन्य कार्यकर्तेच्या सह्या आहेत.Post a Comment

0 Comments