Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

15 वर्षे नोकरीवर हजर नसतानाही खात्यात पगार जमा ; गुन्हा दाखलऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
लंडन - इटलीमध्ये एका रुग्णालयात काम करणाऱ्या व्यक्तीला ‘गैरहजर राहणाऱ्यांस 'किंग' म्हटले जात आहे. तो कोणतीही नोटीस किंवा अर्ज न देता गेल्या १५ वर्षांपासून आपल्या कामावर येतच नव्हता. या १५ वर्षांच्या कालावधीत त्याने दरमहा वेतनही घेतले. पगाराच्या दिवशी त्याच्या खात्यात पैसे जमा व्हायचे. चर्चेत आलेल्या या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. त्याने सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीत एवढी मोठी सुटी व वेतन घेण्याचा विक्रम केला आहे. या व्यक्तीला १५ वर्षात ५.३८ लाख युरो (सुमारे ४.८ कोटी रुपये) वेतन मिळाले. या कार्यवाहीबाबत एचआर व व्यवस्थापकास काहीही माहिती नव्हती.

रुग्णालयात गैरहजर असणा-या व्यक्तीचे वय ६७ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. १५ वर्षांनी या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर इटलीच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. या व्यक्तीवर आता फसवणूक, खंडणी, कार्यालयाच्या दुरुपयोगाचे आरोप करण्यात आले आहेत, रुग्णालयाच्या सहा व्यवस्थापकांवरही कारवाई सुरू आहे. त्यांनी अनुपस्थित राहिल्यानंतरही कारवाई केली नाही. पोलिस चौकशीत आढळून आले की, आरोपीने २००५ मध्ये त्याच्याविरोधात अनुशासनात्मक अहवाल देणाऱ्या व्यवस्थापकाला धमकी दिली होती. नंतर व्यवस्थापक निवृत्त झाल्या व कर्मचारी गैरहजर राहू लागला. गैरहजर राहण्याच्या दुसऱ्या एका प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी पोलिसांना हे समजले.
पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीवेळी सांगितले की, एचआर विभाग व नव्या व्यवस्थापकालाही याबाबत काही माहिती मिळाली नाही. पोलिसांनुसार आरोपी कार्यालयात का येत नाही हे कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. गैरहजर असूनही त्याला वेतन मिळत होते. पोलिस अधिकाऱ्यांना संशय आहे की, या प्रकरणात रुग्णालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. यामुळे पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.


Post a Comment

2 Comments