Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरहून टिटवाळ्यात दरोडा टाकण्यासाठी गेले ; 10 पैकी 3 आरोपींना अटक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कल्याण : अहमदनगर येथून  टिटवाळा या ठिकाणी सशस्त्र दरोडा टिकण्यासाठी गेलेल्या एका दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे टिटवाळ्यात एकच खळबळ उडाली. त्यामुळे टिटवाळा पोलिसांसमोर दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान होतं.

याबाबत समजलेली माहिती अशी की, एका टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, हे दरोडेखोर अहमदनगरहून टिटवाळ्यात दरोडा टाकण्यासाठी गेले होते. यानंतर ते लूटमार केल्यानंतर ते अहमदनगर आलेही, त्याचा परंतु सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा सुगावा लागला. कल्याण तालुका पोलिसांना 10 पैकी 3 आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. अन्य आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले.
कल्याण तालुक्यातील पावशेपाडा आणि काही भागात 20 मार्चच्या पहाटे काही दरोडेखोर आले. त्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. काही घरात घूसून लोकांच्या वस्तू लूटल्या आणि फरार झाले. यानंतर या दरोडेखोरांचा दरोडा टाकतानाचं सीसीटीव्ही फुटेज चांगलंच व्हायरल झालं होते.
तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून 10 पैकी तिघा दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एलसीबी आणि टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांनी यासाठी तपास पथके तयार केली आणि तपास सुरु झाला. अखेर या प्रकरणात 3 दरोडेखोरांना अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संतोष दराडे म्हणाले, “तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु होता. अखेर या प्रकरणी 10 ते 12 दरोडेखोरांपकी 3 दरोडेखोर अक्षय गायकवाड, किरण जांभळकर आणि अनिल पवार या तिघांना अटक करण्यात आली आहे.
इतर आरोपींचा शोध सुरु आहे. नगरमधील पारनेरहून हे दरोडेखोर बोलेरो गाडीत बसून टिटवाळ्यात आले होते. जवळपास 4 लाखाचा ऐवज लूटन ते पसार झाले. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. 

Post a Comment

0 Comments